'मुंबईत येऊन ठाकरे बंधूंना...', मुंबई महापालिकेत भाजप विजयाच्या वाटेवर असतानाच निशिकांत दुबेंचं ट्वीट
Election Results Maharashtra : विशेष म्हणजे, हे ट्वीट अशा वेळी आले आहे की, मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे पिछाडीवर असल्याचे चित्र समोर येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मुंबई येऊन ठाकरे बंधूंना...',
मुंबई महापालिकेत भाजप विजयाच्या वाटेवर असतानाच निशिकांत दुबेंचं ट्वीट
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आघाडी निर्णायक आघाडीवर असताना, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. “मुंबई आकर उद्धव ठाकरे जी तथा राज ठाकरे जी से मिलूँगा” असे ट्वीट करत दुबे यांनी थेट ठाकरे बंधूंना भेटण्याबाबत भाष्य केलंय.
विशेष म्हणजे, हे ट्वीट अशा वेळी आले आहे की, मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे पिछाडीवर असल्याचे चित्र समोर येत आहे. तर दुसरीकडे भाजप स्पष्ट विजयाच्या वाटेवर असल्याचे कल दिसत आहेत. त्यामुळे निशिकांत दुबे यांच्या ट्वीटचा राजकीय अर्थ काय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा : BMC Election Results 2026: मुंबईतील प्रत्येक वॉर्डचा नेमका निकाल, पाहा आता तुमचा नवा नगरसेवक कोण
निशिकांत दुबे हे यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. काही काळापूर्वी त्यांनी ‘मराठी माणूस’ आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर केलेल्या विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्या वक्तव्यांवरून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती.










