Solapur: लग्नाच्या दिवशी नववधूची आत्महत्या, ठाकरेंची रणरागिणी फडणवीसांवर संतापली

मुंबई तक

ADVERTISEMENT

solapur young lady suicide on her wedding day shiv sena ubt leader criticized home minister devendra fadnavis
solapur young lady suicide on her wedding day shiv sena ubt leader criticized home minister devendra fadnavis
social share
google news

Solapur Suicide Case Devendra Fadnavis: विजयकुमार बाबर, सोलापूर: सोलापूर शहरापासून कुमठे रोडवर सोमवारी (18 डिसेंबर) सकाळी एका नववधूने लग्नादिवशीच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. सालेहा महिबूब शेख (वय 25 वर्ष) असे मृत नववधूचे नाव आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून सालेहा शेख हिला भयंकर असा त्रास देण्यात आला होता. तिच्या फोटोंचा गैरवापर करत बनावट फोटो तयार करून सालेहाच्या होणाऱ्या पतीला देखील फोटो पाठवण्यात आले होते. माझ्यासोबत लग्न कर अन्यथा तुझ्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्यात येईल अशी धमकीही आरोपीने दिली होती. (solapur young lady suicide on her wedding day shiv sena ubt leader criticized home minister devendra fadnavis)

ADVERTISEMENT

बनावट फोटोद्वारे लग्न तोडण्याची भीती दाखवत सालेहा हिला ब्लॅकमेल करण्यात आले होते. या सर्व त्रासाला कंटाळून नववधू सालेहा हिने लग्नाच्या दिवशीच राहत्या घरी आत्महत्या केलेली. या घटनेने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी मंगळवारी दुपारी नववधूच्या घरी जाऊन मृत सालेहा हिच्या आई वडिलांचे सांत्वन केले. नववधूची आई अजूनही धक्क्यातून बाहेर आली नाही. अतिशय संतापजनक घटना सोलापुरात घडली आहे. महाराष्ट्र राज्याचा यूपी बिहार झालंय का?, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असा सनसनाटी आरोप ठाकरे गटाच्या नेत्या अस्मिता गायकवाड यांनी केला आहे.

तीन संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल

विजापूर नाका पोलीस ठाण्यात तीन संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सालेहा महिबूब शेख या तरुणीस अनेक दिवसांपासून समीर चांदसाब शेख (रा,कुमठे गाव,सोलापूर) हा एकतर्फी प्रेम करत होता. समीर याने अनेकदा सालेहा या तरुणीस प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता. सालेहा हिने नकार देताच समीर शेख याने सालेहाला धमकी देण्यास सुरुवात केली होती. संशयित आरोपी समीर शेख याच्या दोन मित्रांनी देखील सालेहा शेख हिला धमकी देत लग्न तोडण्याची भीती दाखवली होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> पतीसाठी अशरफा बनली ‘सपना दीदी’; दाऊदाला मारण्याचा रचला होता कट! वाचा Inside Story

याबाबतची सविस्तर फिर्याद सालेहा शेखचे वडील महिबूब शेख यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात समीर चांदसाब शेख, सलमान पिरसाब शेख, वसीम सैपन शेख (तिघे रा,कुमठे गाव,सोलापूर) या तिघां विरोधात भा.द.वि. 306, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 ई प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेना नेत्या अस्मिता गायकवाडांचे डोळे पाणावले

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी नववधू सालेहा हिच्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी नववधूच्या आईने हंबरडा फोडला त्यावेळी अस्मिता गायकवाड यांचे देखील डोळे पाणावले होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून होणारा त्रास आणि त्यातून आत्महत्येच्या घटना सोलापुरात वाढल्या आहेत. संबंधित आरोपीवर 306 ऐवजी 302 चा म्हणजेचा खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीच त्यांनी यावेळी केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Crime : चहा द्यायला उशीर झाला! तलवारीने बायकोचं मुंडकंच छाटलं

पोलीस ठाण्यात केलेली तक्रार, पण घात झालाच

नववधू सालेहाचे वडील महिबूब शेख यांनी धक्कादायक माहिती माध्यमांना दिली. नववधू सालेहा हिला अनेक दिवसांपासून धमकी दिली जात होती. सालेहाचे लग्न मोडण्यासाठी तीन संशयित आरोपींबाबत आम्ही लेखी तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती. संबंधित संशयित आरोपीवर कडक कारवाई झाली असती तर सालेहाचे थाटामाटात लग्न होऊन तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली असती. पण माझ्या मुलीचा शेवट झालाच. अशी संतप्त प्रतिक्रिया महिबूब शेख यांनी दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT