Vijay Wadettiwar : “एकनाथ शिंदेंचं हे शेवटचं अधिवेशन, भाजपने तयारी केलीये”
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या बंडाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra political Crisis, Ajit Pawar : अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच इतर पक्षातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या बंडाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. (Vijay Wadettiwar Reaction On Ajit Pawar revolt)
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या बंडाबद्दल बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, ती अनपेक्षित होती. शरद पवार यांच्याकडून फूट रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. शरद पवार यांनी अजित पवार यांनाही समजावण्याचा प्रयत्न केला.”
वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!
“महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून टाकणारी ही फूट आहे. सत्ता गेल्यावर सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक राहू शकत नाही. मागील काही दिवसांपासून अजित पवारांचा सत्तेकडे कल दिसत होता”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
शरद पवार महाविकास आघाडीबरोबर…
वडेट्टीवार असंही म्हणाले की, “शरद पवार हे महाविकास आघाडी बरोबर राहतील. त्यांचा निर्णय ते घेतील. काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि इतर पक्ष या सगळ्यांची मोट बांधण्याचा काम काँग्रेसला करावा लागेल. काँग्रेसला महाविकास आघाडी म्हणून जनतेच्या पुढे जावे लागेल, त्याची तयारी आम्ही करतो आहोत.”
“मुख्यमंत्री शिंदेंचं हे शेवटचं अधिवेशन”
“मला जे कळतंय त्यातून असं दिसून येत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे शेवटचं अधिवेशन असेल. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांना जास्त काळ निर्णय रोखून ठेवता येऊ शकत नाही. सरकारला सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपने पुढची तयारी केल्याचं हे यावरून दिसत आहे”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
ADVERTISEMENT
वाचा >> “अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story
“मंत्रिमंडळाचा विस्तार त्यांना करायचा नाही. त्यात तथ्य नाही. विस्तार केला तर उद्रेक होईल. काल अनेकांच्या चेहऱ्यावर त्यांची फसगत झाल्याचं दिसत होतं”, असं विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
वाचा >> Ajit Pawar : भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी
“डिमोशन करून त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) असलेल्या कारभाराचे दोन तुकडे करणे, हे कोणाला सहन होणार नाही. मुख्यमंत्री होते आता त्यांना उपमुख्यमंत्री केलं हे ठीक होतं. आता हाय कमांडने दोन-दोन उपमुख्यमंत्री केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पर्याय उभा करतात का? अशी चर्चा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे अस्थिरता वाढेल”, असा टोला वडेट्टीवार यांनी फडणवीस यांना लगावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT