Video : बाथरूमपेक्षाही लहान खोली, 500 रूपये घरभाडे... डिलिव्हरी बॉयचा संघर्ष पाहून डोळ्यात येईल पाणी

मुंबई तक

Zomato Boy Viral Video : व्हायरल व्हिडिओत एका डिलिव्हरी बॉयने त्याचा संघर्ष सांगितला. बाथरूमपेक्षा लहान खोलीत तो राहतोय आहे, 500 रूपये या घराचे भाडे आणि 50 रूपयाची बिर्याणी खाऊन हा तरूण दिवस काढतो आहे. या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.

ADVERTISEMENT

 या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.
zomato delivery boy video viral living in bathroom sized room in mumbai news
google news

बातम्या हायलाइट

point

व्हायरल व्हिडिओत डिलिव्हरी बॉयने त्याचा संघर्ष सांगितला.

point

बाथरूमपेक्षा लहान खोलीत तो राहतोय आहे

point

या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.

Zomato Boy Viral Video : सोशल मिडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्म असतात, तर काही व्हिडिओ पाहून तुम्ही भावुक झाल्या शिवाय राहु शकत नाही. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका डिलिव्हरी बॉयने त्याचा संघर्ष सांगितला. बाथरूमपेक्षा लहान खोलीत तो राहतोय आहे, 500 रूपये या घराचे भाडे आणि 50 रूपयाची बिर्याणी खाऊन हा तरूण दिवस काढतो आहे. या व्हिडिओची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.

मुंबईला स्वप्ननगरी म्हटले जाते, यासाठी अनेकजण आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठतात. मात्र मुंबईत आल्यावर अनेकांना खूप संघर्ष करावा लागतो. राहण्या खाण्याची पंचाईत होते.मात्र तरीही आपल्या स्वप्नांसाठी अनेकजण हा संघर्ष करत; असतो. आता एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये त्याने मुंबईतला त्याचा अनुभव शेअर केला आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी सरकार 46 हजार कोटी आणणार कुठून?

व्हिडिओतला हा मुलगा ईशान्येचा रहिवासी असून त्याचे नाव प्रंजॉय बोरगोयरी आहे. तो कामाच्या शोधात मुंबईत आला होता. त्याची सध्या परिस्थिती अशी आहे की, तो आता अनेक रूम पार्टनर्ससह मोठ्या अडचणीत आपले जीवन जगत आहे. व्हिडिओमध्ये तो त्याच्या खोलीकडे जाणारी अरुंद गल्ली दाखवतो आणि त्याच्या खोलीला जोडलेला जिना दाखवतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by qb_07 (@qb__.07)

प्रंजॉय पुढे सांगतो की, तो 500 रुपये भाड्यावर या घरात राहतो. व्हिडिओत तुम्ही डिलिव्हरी बॉयच्या एका मित्राला पाहू शकतात, ज्याला तो सोनू भाई म्हणतो, जो पायऱ्या चढून खोलीत जातो. यानंतर काम करणारा मुलगा त्याच्या इतर रूममेट्सना आणि त्यांचे सामान घरात पडलेले दाखवतो. तसेच पुढे ही लोकं व्हिडीओमध्ये 50 रुपयांना विकत घेतलेल्या बिर्याणीचे पॅकेट खाताना दिसत आहेत

हे वाचलं का?