Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी सरकार 46 हजार कोटी आणणार कुठून?
Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana : महाराष्ट्रावर आधीच 7.80 लाख कोटी रूपयांचं कर्ज असल्याने अर्थखात्याने या योजनेवर आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी सरकार 46 हजार कोटी आणणार कुठून असा सवाल उपस्थित होतं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडक्या बहीण योजनेवर अर्थखात्याचे आक्षेप
महाराष्ट्रावर आधीच 7.80 लाख कोटी रूपयांचं कर्ज
योजनेसाठी सरकार 46 हजार कोटी आणणार कुठून
Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहिन्याला 1500 रूपये जमा होणार आहे. राज्यातील तब्बल 2 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. दरम्यान महाराष्ट्रावर आधीच 7.80 लाख कोटी रूपयांचं कर्ज असल्याने अर्थखात्याने या योजनेवर आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी सरकार 46 हजार कोटी आणणार कुठून असा सवाल उपस्थित होतं आहे. (ladki bahin yojana ajit pawar finance department objection where will the shinde government bring 46 thousand crores eknath shinde mukhymantri majhi ladki bahin yojana)
महायूती सरकारकडून या योजनेचा गाजावाजा करण्यात येत असला तरी अजित पवार मंत्री असलेल्या खात्याच्या अर्थ विभागानेच या योजनेला विरोध केला होता. मात्र हा विरोध डावलून सरकारने ही योजना मंजूर केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहेत. विशेष म्हणजे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात अर्थखात्याने घेतलेले आक्षेप देखील आता समोर आले आहेत. हे आक्षेप काय आहेत? हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Guru Waghmare: 'स्पा'मध्ये हत्या, 'चुलबुल'नं मांडीवर 22 नावं का गोंदवलेली? चक्रावून टाकणारी Inside स्टोरी
महाराष्ट्रावर 7.8 लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना आणणे कितपत योग्य आहे? लाडकी बहिण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रूपये कुठून आणणार ? या संदर्भातील तरतूद कशी करायची? मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी 4,677 कोटी रूपये मंजूर कसे? मुलगी 18 वर्षांची होताच, 1.1 लाख रुपये देतो, त्यासाठी वर्षाला 125 कोटी रूपये लागतात. प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या 5 टक्के म्हणजे 2,223 रूपयांचा खर्च अवास्तव आहे, असे अनेक आक्षेप अर्थ खात्याने लाडकी बहिण योजनेवर उपस्थित केले आहेत
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अर्थखात्याचा विरोध डावलून मंत्रिमंडळाने योजनेला मंजूरी दिल्याची सुत्रांकडून मिळते आहे. तसेच लाडकी बहिण योजनेवरून आता राजकारण सूरू झालं आहे. तिजोरीत पैसै नसताना मोठमोठ्या योजनांची घोषणा कशासाठी? निवडणुका संपल्यानंतर योजना बंद होतील असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
हे ही वाचा : Narayan Rane : 'भाजपने 288 जागा लढवाव्या', शिंदे-अजितदादासोबतची युती तोडण्याचा राणेंचा सल्ला?
दरम्यान आता महाराष्ट्रावर 7.80 लाख कोटी रूपयांचं कर्ज असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींसाठी 46 हजार कोटी कुठून आणणार? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT