ठाणे महानगरपालिका : 2017 साली शिवसेनेची सत्ता, राष्ट्रवादीने मिळवल्या होत्या 34 जागा, आता कोणाची येणार सत्ता?
Thane Municipal Corporation Election : 2017 साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने होते. त्या वेळी शिवसेना एकसंध होती. या निवडणुकीत शिवसेनेने 67 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आणि एकहाती सत्ता स्थापन केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाणे महानगरपालिका : 2017 साली शिवसेनेची सत्ता
राष्ट्रवादीने मिळवल्या होत्या 34 जागा, आता कोणाची येणार सत्ता?
Thane Municipal Corporation Election : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय गड मानल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेची शेवटची निवडणूक 2017 साली झाली होती. त्यानंतर आता जवळपास 8 ते 9 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. ठाणे महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबईच्या नजीकचा जिल्हा असलेल्या लागून असलेल्या या महत्त्वाच्या महानगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप, ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणूक 2017 : काय होता निकाल?
2017 साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने होते. त्या वेळी शिवसेना एकसंध होती. या निवडणुकीत शिवसेनेने 67 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आणि एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 23 जागांवर समाधान मानावे लागले आणि तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंचं ठाण्यात वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालंय. आताही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
गेल्या सुमारे तीन दशकांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे हा शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. केवळ 1987 ते 1993 या सहा वर्षांच्या कालावधीतच काँग्रेसकडे सत्ता होती. त्यानंतर ठाणे महापालिका आणि शिवसेना हे समीकरण कायम राहिले आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत ठाण्यात भाजपचा प्रभाव लक्षणीयरीत्या वाढताना दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर, यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे जोरकसपणे मांडली होती. त्यासाठी भाजपने गणेश नाईक यांना ठाण्यात सक्रिय भूमिका दिली होती. या घडामोडींमुळे शिंदे गटाच्या शिवसेनेत काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र, सध्याच्या स्थितीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना युतीतूनच निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा : कल्याण: सासुने 60 वर्षीय मित्रासोबत मिळून केली सुनेची हत्या! संपत्ती आणि नोकरीच्या वादातून भयानक घटना










