'बुरखेवाली मेयर बनेगी...' आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल...', CM फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

मुंबई तक

मुंबईचा महापौर कोण होणार? यावरून सध्या बराच राजकीय वाद सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुद्द्यावरून एका वेगळ्याच गोष्टीवर भाष्य करत ठाकरे बंधूंना नवं आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

waris pathan said a burqa clad woman will become mayor we thought that those who speak about marathi people would now criticize him cm fadnavis gave a new challenge to thackeray brothers
CM फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
social share
google news

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीने आज (3 जानेवारी) संयुक्त सभा घेत प्रचाराला सुरुवात केली. सध्या मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी होणार.. यावर बरीच चर्चा रंगली आहे. अशावेळी आजच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर बोलताना ठाकरे बंधूंना डिवचलं आहे. 

वारिस पठाण म्हणाले की, 'बुरखेवाली मेयर बनेगी...' याचा उल्लेख करत फडणवीसांनी शिवसेना UBT आणि मनसेच्या युतीला डिवचलं आहे. यावर ते का काही बोलत नाही असा सवाल त्यांनी या दोन्ही पक्षांना यावेळी केला आहे. 

'आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील...', CM फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.. पाहा काय म्हणाले

'पण परवा वारिस पठाण बोलून गेले 'बुरखेवाली मेयर बनेगी...' आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील. पण मला समजलंच नाही.. अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले.. सकाळचा भोंगा बोलेनाच.. विचारलं तर तोंडातून शब्दच निघेना. एक जण यांच्यातला बोलायला तयार नाही. हे त्याचं उत्तर देण्याकरिता तयार नाही. आता आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल तर कदाचित या भोंग्यातून आवाज निघतील. म्हणून त्यांच्या छातीवर उभा राहून सांगतो की, या ठिकाणी महापौर हिंदूच बनेल. या ठिकाणी महापौर मराठीच बनेल..', असं म्हणत फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना चँलेंज दिलं आहे.

हे ही वाचा>> मुंबई Tak महाचावडी: अमराठी Vote Bank असताना BJP मुंबईचं मराठीपण टिकवू शकेल का? पाहा CM फडणवीसांचं उत्तर काय

पाहा आजच्या सभेत देवेंद्र फडणवीस नेमकं काय-काय म्हणाले.. 

'शिंदे साहेब तुम्ही यांचं कॅम्पेन बघितलं मला तर आता लक्षात आलंय की, मुंबईत निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. या टोळीमध्ये काही अबोध बालकं देखील आहेत. जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणतात सगळं आम्हीच केलं. त्याठिकाणी कोस्टल रोड आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp