मुंबई Tak महाचावडी: अमराठी Vote Bank असताना BJP मुंबईचं मराठीपण टिकवू शकेल का? पाहा CM फडणवीसांचं उत्तर काय
CM Devendra Fadnavis on Mumbai Marathi: मुंबईत भाजपची सत्ता आली तर मराठी संस्कृती धोक्यात येईल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. पाहा या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई Tak महाचावडीवर नेमकं काय उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी या मुद्द्यावर प्रचार सुरू झाला आहे. ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं उत्तर दिलं असून मराठी वोट वँक ही आमचीच आहे. कारण मुंबईतून सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपचे 15 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मराठी, अमराठी ही व्होट बँक आमचीच आहे. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या मराठी वोट बँकेच्या मुद्द्याला देखील हात घातला आहे. मुंबई Tak च्या महाचावडीवर देवेंद्र फडणवीसांनी यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली.
मुंबई Tak च्या महाचावडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांना मुंबईचं मराठीपण नेमकं कसं टिकवलं जाणार याबाबत सवाल करण्यात आला. ज्यावर त्यांनी मुंबईत मराठीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं सांगत मराठी वोट बँक देखील आपलीच असल्याचा दावा केला
पाहा मुंबईचं मराठीपण कसं टिकवणार यावर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले
प्रश्न: ही निवडणूक थोडी मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्यावर चालली आहे. समजा, मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आली तर मुंबईतील मराठीपण कसं टिकवून ठेवणार आहात? हे तुम्ही कसं पाहणार आहात?
मुख्यमंत्री फडणवीस: पहिल्यांदा तुम्ही डोक्यातून काढून टाका की, मराठी वोट बँक दुसऱ्याची आहे आणि अमराठी आमची आहे. मराठी वोट बँक आमची आहे. हे लक्षात ठेवा. जर मराठी माणसाने भाजपला मतं दिली नसती.. सलग तीन निवडणुकांमध्ये आमचे 15 उमेदवार निवडून येत आहे. दुसरे कोणाचेच नाहीत. कोणीही दावा करू द्या.. भाजपच नंबर 1 राहिलेला आहे.
सगळ्या मराठीबहुल भागात आम्ही निवडून येतो. त्यामुळे मराठी, अमराठी.. सगळे आमचेच आहेत. असं आहे की, पहिल्यांदा मुंबईचं मराठीपण कोणी घालवू शकत नाही. मुंबई मराठीच आहे. कॉस्मोपॉलिटिन शहर आहे. या शहरामध्ये व्यवसायाकरिता लोकं येतात. पूर्वी मजूर यायचे.. आता या शहरामध्ये जे लोकं येतात.. टेक्नोलॉजीचं क्षेत्र आहे, आर्थिक बाबींशी संबंधित क्षेत्र आहे. त्यामध्ये देखील बाहेरून लोकं येतात. तरीही मुंबईचं मुंबईपण हे कुठेही घालवू शकत नाही कोणी. आज बघा, मुंबईच्या गणेशोत्सवात...
सर्व प्रकारचे लोकं गणेशोत्सव साजरा करताना दिसतात ना तुम्हाला.. अगदी पारंपारिक मराठी पद्धतीने साजरा करताना दिसतात. त्यामुळे मुंबईची संस्कृती आपल्याला टिकवायचीच आहे. पण मुंबईची संस्कृती आणि त्याची जी वाटचाल आहे ती कुठेही इकडेतिकडे होऊ देणार नाही. त्यात काही तडजोड करणार नाही, ते कोणीही करू शकत नाही.
हे ही वाचा>> मुंबई Tak महाचावडी: मराठी माणूस ते मुंबईचा महापौर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा..
मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर त्यांना मुंबईच्या महापौर पदाबद्दल देखील विचारण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री ठासून सांगितलं की, मुंबईचा महापौर हा हिंदू, मराठीच होईल. पाहा याबाबत फडणवीस नेमकं काय म्हणाले.










