काँग्रेस की ठाकरे बंधू? मुंबईत मुस्लिम मतदार कोणाला मतदान करणार? असेंडिया कंपनीचा सर्व्हेतून सगळं समोर
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार कोणाला मतदान करणार? याबाबतचा सर्व्हे असेंडिया कंपनीने केलाय. या सर्व्हेमधून कोणती आकडेवारी समोर आलीये? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईत मुस्लिम मतदार कोणाला मतदान करणार?
ठाकरे बंधूंना मतविभाजनाचा फटका बसणार? असेंडिया कंपनीचा सर्व्हे समोर
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं चित्र आहे. कारण ठाकरे बंधूंनी भाजपविरोधात लढण्यासाठी 'MaMu' म्हणजे मराठी-मुस्लिम मतदारांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, ठाकरेंच्या बंधूंच्या या रणनितीला काँग्रेसमुळे फटका का बसणार का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण भाजपला पराभूत करण्याची क्षमता असलेल्या ठाकरे बंधूंसोबत जायचं की नेहमी सर्वसमावेश भूमिका काँग्रेसला मतदान करायचं? हा सवाल मुस्लिम मतदारांसमोर उभा राहू शकतो. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार कोणाला मतदान करणार? याबाबतचा सर्व्हे असेंडिया कंपनीने केलाय. या सर्व्हेमधून कोणती आकडेवारी समोर आलीये? जाणून घेऊयात..
41 टक्के मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठिशी, ठाकरेंना बंधूंना फटका बसणार?
असेंडिया कंपनीच्या सर्व्हेनुसार, मुंबईतील मुस्लिम मतदारांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. जवळपास 41 टक्के मुस्लिम मतदार काँग्रेसला मतदान करण्यास इच्छुक असल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आघाडीला 28 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या महायुतीला मुस्लिम मतदारांचा थेट पाठिंबा तुलनेने कमी असून केवळ 11 टक्के मतदार महायुतीकडे झुकलेले आहेत. उर्वरित 20 टक्के मतदार इतर पर्यायांकडे वळण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.
ही आकडेवारी पाहता मुस्लिम मतदारांमध्ये एकत्रित मतदान न होता मतांचं विभाजन होण्याची शक्यता अधिक असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र या मतांचा मोठा हिस्सा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला गेल्यास त्याचा थेट फटका काँग्रेस आणि ठाकरे गट-मनसे आघाडीला बसू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.










