'मी देवेंद्रजींना सांगितलं म्हणून मागचा महापौर...', मुंबईच्या महापौराबाबत एकनाथ शिंदेंचा अत्यंत मोठा गौप्यस्फोट
मुंबई महापालिका 2017 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा जो महापौर झाला त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसा्ंना विनंती केली म्हणून शिवसेनेचा महापौर झालेला असा दावा एकनाथ शिंदे यांनी आपल्या आजच्या भाषणात केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) प्रचाराचा नारळ शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्या महायुतीने आज वरळी डोम येथील सभेत फोडला. प्रचाराच्या सुरुवातीलाच शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईचा मागचा महापौर शिवसेनेचा व्हावा यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. असा अत्यंत मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
2017 साली मुंबई महापालिकेची जी निवडणूक झालेली त्यामध्ये शिवसेना (अखंडीत) आणि भाजप यांची युती तुटली होती. तेव्हा दोन्ही पक्ष हे स्वबळावर लढत होते. त्यावेळी एकीकडे भाजप आणि शिवसेना हा राज्यातील सरकारमध्ये सत्तेत होते. पण मुंबई महपालिका निवडणुकीत ते आमने-सामने आले होते. त्यावेळी मुंबईत शिवसेनेचे 84 नगरसेवक आणि भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेकडे बहुमत नसल्याने त्यांना थेट महापौर निवडणं कठीण होऊन बसलं होतं. त्याकाळात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महापौर पदाबाबत अनेक घडामोडी सुरू होत्या.
हे ही वाचा>> मुंबई Tak महाचावडी: अमराठी Vote Bank असताना BJP मुंबईचं मराठीपण टिकवू शकेल का? पाहा CM फडणवीसांचं उत्तर काय
अखेर महापौर निवडीच्या शेवटच्या दिवशी अगदी काही वेळ शिल्लक असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की, भाजप महापौर पदाच्या शर्यतीतून माघार घेत आहे. ज्यामुळे शिवसेनेचा महापौर पदाचा मार्ग सुकर झाला आणि शिवसेनेला महापौर पद राखता आलं होतं.
पण यात याचबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज (3 जानेवारी 2026) केलेल्या भाषणातून अत्यंत खळबळजनक दावा केला.










