'शब्द ठाकरेंचा...' ठाकरे बंधूंनी मुंबईकरांना दिली 'ही' वचनं, वचननामा जसाच्या तसा..
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ubt आणि मनसेचा संयुक्त वचननामा जाहीर करण्यात आला. पाहा यामध्ये ठाकरे बंधूंनी मुंबईकरांना नेमकी कोणती वचनं दिली आहेत.
ADVERTISEMENT

ठाकरे बंधूंचा वचननामा
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर शिवसेना UBT आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी संयुक्त वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्यात मुंबईकरांसाठी अनेक योजना समाविष्ट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हा वचननामा प्रसिद्ध केला असून, यामुळे निवडणुकीत नवे वळण येण्याची शक्यता आहे.
शिवसेना ubt आणि मनसे यांनी महापालिका निवडणुका युतीत लढविण्याची घोषणा केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या युतीचे कारण 'महाराष्ट्राच्या हितासाठी' असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले असून, त्यांचा उद्देश भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला आव्हान देणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील या युतीच सामील आहेत.
पाहा शिवसेना-मनसेचा वचननामा












