मुंबईत महिला वोटर ठाकरे बंधूंना धक्का देणार? 53 टक्के परप्रांतीय महायुतीच्या बाजूने; पाहा असेंडिया कंपनीचा सर्व्हे
Mumbai MahanagarPalika Election 2026 : असेंडिया कंपीनी केलेल्या सर्व्हेतून महिला वोटर ठाकरेंना बंधूंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय. महिला आणि परप्रांतीय मतदार कोणाच्या बाजूने आहे? असेडिंया कंपनीच्या सर्व्हेतून समोर आलेली टक्केवारी जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईत महिला वोटर ठाकरे बंधूंना धक्का देणार?
53 टक्के परप्रांतीय महायुतीच्या बाजूने; पाहा असेंडिया कंपनीचा सर्व्हे
Mumbai MahanagarPalika Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू आणि महायुती ताकदीने मैदानात उतरली असून दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. मराठी माणूस, मुस्लिम नागरिक, परप्रांतीय मतदार असे अनेक गट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, आता महिला मतदारांची भूमिका देखील या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे. लाडकी बहीण सारख्या योजनांच्या माध्यमातून महायुतीने महिला मतदारांना सातत्याने आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. असेंडिया कंपीनी केलेल्या सर्व्हेतून महिला वोटर ठाकरेंना बंधूंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलंय. महिला आणि परप्रांतीय मतदार कोणाच्या बाजूने आहे? असेडिंया कंपनीच्या सर्व्हेतून समोर आलेली टक्केवारी जाणून घेऊयात...
मुंबईतील महिला मतदार कोणाच्या बाजूने?
महिला मतदारांचा विचार केला असता, मुंबईतील 50 टक्के महिला मतदार भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीच्या बाजूने असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. तर ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीला केवळ 22 टक्के महिला मतदारांचा पाठिंबा आहे. काँग्रेस आघाडीला 15 टक्के, तर इतर पक्षांना 13 टक्के महिला मतदार पसंती देत आहेत. महिला मतदारांमध्ये महायुतीला मिळणारा हा पाठिंबा ठाकरे बंधूंसाठी चिंतेचा विषय मानला जात आहे.
परप्रांतीय मतदार भाजपवर खुश
परप्रांतीय मतदारांच्या बाबतीत महायुतीला सर्वाधिक फायदा होताना दिसतो. गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय अशा परप्रांतीय मतदारांपैकी 53 टक्के मतदार महायुतीच्या बाजूने असल्याचं सर्व्हे सांगतो. काँग्रेस-वंचित आघाडीला 19 टक्के परप्रांतीय मतदारांचा पाठिंबा असून ठाकरे गट आणि मनसे युतीला 15 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित 13 टक्के मतदार इतर पर्यायांकडे झुकलेले आहेत. त्यामुळे परप्रांतीय मतदार महायुतीचा मजबूत आधार ठरत असल्याचं चित्र आहे.
हेही वाचा : मुंबईत मराठी माणूस ठाकरे बंधूंना साथ देणार की महायुतीला? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे समोर










