शरद पवार, रामदास आठवलेंसह महाराष्ट्रातील सात खासदार एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त होणार, पाहा संपूर्ण यादी

मुंबई तक

Maharashtra Politics : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सातही खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी पूर्ण होणार आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. फौजिया खान, भाजपचे डॉ. भागवत कराड , धैर्यशील मोहन पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या प्रियंका चतुर्वेदी तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Politics
Maharashtra Politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त होणार

point

पाहा कोणा-कोणाचा समावेश?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार, छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत असून, हे सर्व सदस्य राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. देशभरात भाजपच्या सर्वाधिक म्हणजे तब्बल 30 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ याच काळात पूर्ण होत आहे.

दरम्यान, 2026 या वर्षात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर, राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ याच वर्षी समाप्त होणार आहे. यामध्ये मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत.

हेही वाचा : दिवगंत मनसे नेते रमेश वांजळेंची कन्या पुणे मनपा निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत उमेदवार, संपत्ती किती?

महाराष्ट्रातील सात खासदारांचा कार्यकाळ संपणार

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सातही खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी पूर्ण होणार आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. फौजिया खान, भाजपचे डॉ. भागवत कराड , धैर्यशील मोहन पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या प्रियंका चतुर्वेदी तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp