30 पानी सुसाईड नोट अन् अंगावर लिहिलं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव; पुण्यातील 56 वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन...
एका 56 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. तसेच, त्याने 30 पानांची सुसाईड नोट लिहून एका राजकीय पक्षाच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर, पीडित व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या अंगावर कथित उमेदवाराचं नाव सुद्धा लिहिलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
30 पानी सुसाईट नोट अन् अंगावर लिहिलं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव
पुण्यातील 56 वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन...
Pune Crime: महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे, लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत एका 56 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. तसेच, त्याने 30 पानांची सुसाईड नोट लिहून एका राजकीय पक्षाच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर, पीडित व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या अंगावर कथित उमेदवाराचं नाव सुद्धा लिहिलं होतं. घटनेनंतर, पोलिसांना प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला.
30 पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या...
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव सादिक कपूर (वय 56, रा. हडपसर, पुणे) असं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सादिक कपूर यांच्यावर यापूर्वी मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर या कायद्यांतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आज (4 जानेवारी) सकाळी सुमारे 9:30 वाजताच्या सुमारास, सादिक कपूर यांनी आधी 30 पानी सुसाईड नोट लिहिली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या अंगावर फारूक इनामदार यांचं नाव लिहिले होते.
हे ही वाचा: नमो भारत ट्रेनमध्ये जोडप्याचे शारीरिक संबंध, फुटेज व्हायरल अन् दोघांबद्दल धक्कादायक माहिती आली समोर!
जमीनविषयक वादातून मानसिक तणाव वाढला अन्...
मृताच्या कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार फारूक इनामदार यांच्यामुळेच पीडित व्यक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. आता पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असल्याची माहिती आहे. फारूक इनामदार हे सय्यद नगर प्रभागातून उमेदवारी लढवणार असून ते त्या भागातील माजी नगरसेवक देखील आहेत. मात्र, मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी जमीनविषयक वादातून मानसिक तणाव वाढल्याने आणि फारूक इनामदार यांच्या दबावामुळेच सादिक यांनी स्वत:चं आयुष्य संपवल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा: मुंबईत मराठी माणूस ठाकरे बंधूंना साथ देणार की महायुतीला? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे समोर
संबंधित घटना कॅम्प परिसरातील ई-स्ट्रीट येथील एका कॉम्प्लेक्समध्ये घडली असून तिथे सादिक कपूर यांचं कार्यालय होतं. याच कार्यालयात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. आता, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सुसाईट नोटमधील मजकूर, जमीन वाद, आर्थिक व्यवहार आणि लावण्यात आलेले राजकीय आरोप या बाबींचा सखोल तपास करत आहेत. चौकशीनंतर, घटनेमागचं नेमकं कारण उघडकीस येईल.










