Maharashtra Weather : पुढील 24 महत्त्वाचे, IMD चा महत्त्वाचा अलर्ट
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) इतर हवामान स्त्रोतांच्या अंदाजानुसार, उद्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मुख्यत्वे हवामान स्वच्छ राहणार आहे. राज्यात तापमान सामान्यपेक्षा काही अंशाने अधिक राहण्याची शक्यता आहे, जाणून घ्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवामान विभागाचा अंदाज
राज्यात काही ठिकाणी मुख्यत्वे आकाश स्वच्छ
जाणून घ्या हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी मुख्यत्वे आकाश स्वच्छ, काही भागांत ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) इतर हवामान स्त्रोतांच्या अंदाजानुसार, उद्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मुख्यत्वे हवामान स्वच्छ राहणार आहे. राज्यात तापमान सामान्यपेक्षा काही अंशाने अधिक राहण्याची शक्यता आहे, जाणून घ्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : शिक्षकाने गोठ्यात नेऊन तिसरीच्या विद्यार्थिनीवर केले अत्याचार, गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर प्रकरणंही बाहेर
मुंबई आणि कोकण :
मुंबईसह कोकणात वातावरण कोरडं राहील, दुपारी हलके ढग येण्याची शक्यता आहे. दुपारी आकाश स्वच्छ राहील, तसेच पावसाची शक्यता नाही. उष्णतेत वाढ जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र :
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात स्वच्छ ते आंशिक ढगाळ वातावरण राहील. या एकूण विभागात हवामान कोरडं राहणार आहे. ढगाळ वातावरण असलं तरी अवकाळी पावसाची शक्यता नसेल.
नागपूर आणि विदर्भ :
नागपूर आणि विदर्भात मुख्यत्वे स्वच्छ आकाश राहील, असा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग कमी होईल. थंडावा कमी झाला असून या विभागात कमाल तापमान हे 32 ते 35, तसेच किमान तापमान 30 ते 40 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.










