नमो भारत ट्रेनमध्ये जोडप्याचे शारीरिक संबंध, फुटेज व्हायरल अन् दोघांबद्दल धक्कादायक माहिती आली समोर!
नमो भारत एक्स्प्रेस ट्रेनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले होते. आता, या दोघांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नमो भारत ट्रेनमध्ये जोडप्याचे शारीरिक संबंध
फुटेज व्हायरल अन् दोघांबद्दल धक्कादायक माहिती आली समोर!
Crime News: सध्या, उत्तर प्रदेशात नमो भारत एक्स्प्रेस ट्रेनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले होते. आता, या दोघांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. संबंधित जोडप्याच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा एकमेकांसोबत साखरपुडा झाला असून लवकरच लग्नाचा मुहूर्त ठरवून त्यांचं लग्न लावून दिलं जाणार आहे. तसेच, लग्नासाठी केवळ घरातीलच सदस्य उपस्थित राहणार आहेत.
आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायल...
संबंधित घटना ही 24 नोव्हेंबर रोजी गाजियाबादहून मेरठला जाणाऱ्या नमो भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये संध्याकाळच्या सुमारास घडली. त्यानंतर, ट्रेनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं. 20 डिसेंबर रोजी 1 ते 3 मिनिटांच्या चार व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, हे प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं.
हे ही वाचा: 'मी देवेंद्रजींना सांगितलं म्हणून मागचा महापौर...', मुंबईच्या महापौराबाबत एकनाथ शिंदेंचा अत्यंत मोठा गौप्यस्फोट
दोघांचा साखरपुडा झाल्याने प्रकरण चर्चेत
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जोडपं हे मोदीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. तसेच, दोघे गाजियाबादच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून तरुण बी.टेक आणि तरुणी बीबीए कोर्सची विद्यार्थिनी आहे. दोघांचा आक्षेपार्ह अवस्थेत असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, त्यांना काही काळासाठी गावातून बाहेर पाठवण्यात आलं होतं. आता दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
हे ही वाचा: 'बुरखेवाली मेयर बनेगी...' आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल...', CM फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
या प्रकरणात 'आरआरटीएस'कडून मुरादनगर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या ट्रेन ऑपरेटरचं सुद्धा एफआयआरमध्ये नाव असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये, संबंधित तरुण आणि तरुणीची ओळख गुप्त ठेवण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोघांच्या साखरपुड्याशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.










