स्वयंभू बाबाचे 7 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य! मुलीच्या आई-वडिलांनीच व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...

मुंबई तक

स्वयंभू बाबा मल्लिकार्जुन मुत्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आल्याचं वृत्त आहे. स्वत:ला बाबा म्हणवणारी ही व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

स्वयंभू बाबाचे 7 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य!
स्वयंभू बाबाचे 7 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्वयंभू बाबाचे 7 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य!

point

मुलीच्या आई-वडिलांनीच व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...

Crime News: कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. येथील स्वयंभू बाबा मल्लिकार्जुन मुत्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आल्याचं वृत्त आहे. स्वत:ला बाबा म्हणवणारी ही व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. याप्रकरणी, कथित बाबवर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोपाखाली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. 

7 वर्षांच्या मुलीसोबत बाबाचे अश्लील कृत्य 

एका व्हायरल व्हिडिओमध्ये, कथित बाबा एका 7 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (KSCPCR) या प्रकरणाची दखल घेतली असून यादगीर जिल्हा पोलिसांना आरोपी बाबवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित घटना 19 फेब्रुवारी रोजी यमनुरप्पा मुत्या मठ असलेल्या मेहल रोजा गावात घडली. मूळची सोलापूरची राहणारी ही अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह त्या मठात गेली होती. 

हे ही वाचा: अमरावती: दोन्ही भावांमध्ये चिकन खाण्यावरून वाद... रागाच्या भरात डोक्यात रॉड घालून 12 वर्षीय मुलाचा खून

पोलिसांनी दिली माहिती   

या व्हिडिओमध्ये कथित बाबा मल्लिकार्जुन मुत्या एका मठात संबंधित अल्पवयीन मुलीशी बोलत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यावेळी तिच्यासोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. आयोगाच्या सूचनांनुसार, जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी त्या आश्रमाला भेट दिली आणि मुलीसह तिच्या पालकांचे जबाब नोंदवले. आपणच हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा तिच्या पालकांनी दावा केला. समुपदेशनानंतर, बाल कल्याण समितीने असं नोंदवलं की व्हिडिओमध्ये मुलगी अस्वस्थ दिसत होती आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली. 

हे ही वाचा: 23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार... नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!

दरम्यान, यादगीर पोलिसांनी आरोपी बाबला नोटिस जारी केली असून पीडित मुलीसह तिच्या आई-वडिलांचे जबाब नोंदवले गेले आहेत. तसेच, व्हिडीओमध्ये मुलगी अस्वस्थ असल्याचं दिसत असून काउन्सलिंगनंतर चाइल्ड वेलफेअर कमिटीने FIR (एफआयआर) ची शिफारस केली. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो (POCSO) अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp