पत्नीच्या WhatsApp स्टेटसवर तरुणाची अश्लील कमेंट; संतापलेला पती जाब विचारायला गेला, पण त्याचीच झाली हत्या
Palghar Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व येथील प्रगती नगर भागात आफताब शेख (वय 24) हा तरुण त्याची पत्नी शबाना शेख (22) हिच्यासोबत राहत होता. शुक्रवारी या दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. या खास दिनानिमित्त शबाना हिने आपल्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (2) या तरुणाने त्यावर अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पत्नीच्या WhatsApp स्टेटसवर तरुणाची अश्लील कमेंट
संतापलेला पती जाब विचारायला गेला, पण त्याचीच झाली हत्या
Palghar Crime News , नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीच्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय पतीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस होता. आनंदाच्या दिवशीच पतीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व येथील प्रगती नगर भागात आफताब शेख (वय 24) हा तरुण त्याची पत्नी शबाना शेख (22) हिच्यासोबत राहत होता. शुक्रवारी या दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. या खास दिनानिमित्त शबाना हिने आपल्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (2) या तरुणाने त्यावर अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट केली. केवळ स्टेटसवर कमेंट करून मेहंदी थांबला नाही, तर त्याने इंस्टाग्रामवरही शबानाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आपल्या पत्नीबद्दल असे घाणेरडे शब्द वापरल्याचे समजताच आफताब संतापला. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी आफताब आणि शबाना शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास नालासोपारा पश्चिम येथील हनुमान नगर परिसरात असलेल्या मेहंदी हसनच्या घरी पोहोचले.
वाद विकोपाला गेला आणि रक्ताचा सडा पडला
सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या मेहंदी हसनने अचानक चाकू बाहेर काढला आणि आफताबवर एकामागून एक अनेक वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, आफताब रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. लग्नाच्या वाढदिवसाच्या पहाटेच शबानासमोर तिच्या पतीची निर्घृण हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.










