एकीकडे सून घरकामात व्यस्त; तर दुसरीकडे आजोबाने 9 महिन्यांच्या नातीवर केला बलात्कार, सुनेनं बघताच काय घडलं?

मुंबई तक

Crime News : एका आजोबाने आपल्या 9 महिन्यांच्या नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची आई घरकामात व्यस्त होती. याचा फायदा घेत वासनांध आजोबाने चिमुरड्या नातीवर अत्याचार केले. घरकामानंतर तिची आई मुलीकडे आली तेव्हा तिला हा नराधम आजोबा मुलीसह आक्षेपार्ह अवस्थेत आढळला. महिलेने आरडाओरडा करताच आजोबा फरार झाला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकीकडे सून घरकामात व्यस्त; तर दुसरीकडे आजोबाने 9 महिन्यांच्या नातीवर केला बलात्कार

point

सुनेनं बघताच काय घडलं?

Crime News : एका आजोबाने आपल्या 9 महिन्यांच्या नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची आई घरकामात व्यस्त होती. याचा फायदा घेत वासनांध आजोबाने चिमुरड्या नातीवर अत्याचार केले. घरकामानंतर तिची आई मुलीकडे आली तेव्हा तिला हा नराधम आजोबा मुलीसह आक्षेपार्ह अवस्थेत आढळला. महिलेने आरडाओरडा करताच आजोबा फरार झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. ज्या व्यक्तीने हे नीच कृत्य केल्याचा आरोप आहे, तो दुसरा कोणी नसून त्या चिमुरडीचा नात्याने चुलत आजोबा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील ही घटना आहे.

आई घरकामात व्यस्त अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी घरात होती आणि तिची आई घरकामात व्यस्त होती. याचाच चुलत आजोबाने फायदा घेतला. काम संपवून आई जेव्हा खोलीत पोहोचली, तेव्हा तिला संशयित आरोपी मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळला. आईने आरडाओरडा करताच आरोपीने तिथून पळ काढला. या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सध्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात तपासणी आणि उपचार

शुक्रवारी (27 फेब्रुवारी) मध्यरात्री पोलिसांनी मुलीला जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांच्या पथकाने मुलीची वैद्यकीय तपासणी केली. सध्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सिव्हिल सर्जन डॉ. प्रल्हाद पटेल आणि डॉ. सीमा यांच्यासह डॉक्टरांची टीम मुलीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धाव

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रुतकीर्ती सोमवंशी स्वतः या तपासावर लक्ष ठेवून आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुजीत सिंह भदोरिया, सीएसपी एचआर पांडे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात उपस्थित होते. दरम्यान, फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे लोक हादरुन गेले आहेत.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp