धाकट्या भावाने विधवेची हत्या केली अन् थोरल्या भावाने तिच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : दोन्ही भावांनी मिळून एका विधवा महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. धाकट्या भावाने विधवा महिलेची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली; तर थोरल्या भावाने तिच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाकट्या भावाने विधवेची हत्या केली अन् थोरल्या भावाने तिच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : दोन्ही भावांनी मिळून एका विधवा महिलेचं कुटुंब उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. धाकट्या भावाने विधवा महिलेची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली; तर थोरल्या भावाने तिच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. ही 35 वर्षीय विधवा थोरल्या भावासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये रहात होती. 25 फेब्रुवारी रोजी तिचा लिव्ह इन पार्टनरच्या धाकट्या भावासोबत तिचा वाद झाला. या वादातून त्याने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे यानंतर त्या महिलेचा प्रियकर नशेत घरी आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेकडे बघून त्याला जराही दया वाटली नाही. उलट त्याने महिलेच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दोन्हा आरोपी सध्या फरार आहेत. मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील ही घटना आहे.
मुलीसह प्रियकराच्या घरी
35 वर्षीय मृत महिला शहपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरिओम चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती. तिचा पती वारल्यानंतर ती जबलपूरमध्ये मजुरी करत असताना सहा महिन्यांपूर्वी तिची ओळख हरिओमशी झाली होती. गेल्या चार महिन्यांपासून ती आपल्या 14 वर्षांच्या मुलीसह हरिओमच्या घरी राहण्यास आली होती.
लोखंडी रॉडने वार करून हत्या
पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हरिओमचा धाकटा भाऊ छोटू चौधरी (40) हा घरी आला होता. किरकोळ वादातून त्याने महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. डोक्यावर गंभीर वार झाल्यामुळे महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. आरोपी छोटूने तिला रुग्णालयात नेण्याऐवजी घरीच मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचाराअभावी महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी छोटूने मुलीला धमकावून तिथून पळ काढला.










