पुण्यातील 'त्या' व्यक्तीला परदेशात जायला मदत कोणी केली? अजितदादांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
Ajit Pawar attacks Muralidhar Mohol : दरम्यान, आता पुण्यातील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पुण्यातील 'त्या' व्यक्तीला परदेशात जायला मदत कोणी केली? असा सवाल अजित पवारांनी केलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यातील 'त्या' व्यक्तीला परदेशात जायला मदत कोणी केली?
अजितदादांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल
Ajit Pawar attacks Muralidhar Mohol : "शहरातून गुन्हेगारी हद्दपार झाली पाहिजे,’ असं पालकमंत्री अजित पवार सांगत असतात. पण त्यांच्या पक्षाच्या उमेदवार यादीकडे पाहिले, तर ही भूमिका नेमकी कोणत्या तत्त्वात बसते? हे त्यांनीच स्पष्ट करावे" असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, आता पुण्यातील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पुण्यातील 'त्या' व्यक्तीला परदेशात जायला मदत कोणी केली? असा सवाल अजित पवारांनी केलाय.
एका व्यक्तीला परदेशात जाण्यास मदत कोणी केली, त्याचा पासपोर्ट कोणी काढून दिला आणि तो देशाबाहेर कसा पळून गेला, याची चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी थेट सवाल उपस्थित केला. गेल्या काही वर्षांत भाजपने कोणाकोणाला आणि कशा प्रकारे उमेदवारी दिली, याची माहितीही बाहेर काढावी, असं आव्हान देत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांनीच निलेश घायवळला परदेशात जाण्यास मदत केल्याचे संकेत दिले.
सन 1992 ते 2017 या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास केला असून शहराचं रूपडं पालटल्याचा दावा अजित पवारांनी केला. मात्र, 2017 साली एक वेगळीच राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच काळात विठ्ठल मूर्ती घोटाळ्याचा मुद्दा पुढे आला. विशेष म्हणजे ज्या महापौरांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला, तेच आज भाजपकडून आमच्याविरोधात निवडणूक लढवत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाला कशी दिशा दिली, हे सांगत अजितदादांनी शरद पवारांचं विशेष कौतुक केलं.










