बिघडलेला गाव सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते; विश्वास पाटील नेमकं काय म्हणाले?
Vishwas Patil Statement : बिघडलेला गाव सुधरायचा असेल तर पाटील आणि कुलकर्त्यांना युती करावीच लागते", असं 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले. साताऱ्यातील 'स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी'त शुक्रवारी (दि. २) संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बिघडलेला गाव सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते;
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील नेमकं काय म्हणाले?
Vishwas Patil Statement : "मित्रहो, या सातारच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपण एका पाटलाला बोलावलेलं आहे. पाटील हे आडनाव घेतलं की, तीन फड डोळ्यासमोर उभे राहातात. कुस्तीचा फड, तमाशाचा फड आणि ऊसाचा फड.... पण तुमच्यासमोर बोलणारा हा पाटील शब्दाच्या फडामध्ये रंगणारा आहे.. इथे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा, अशी मागणी जोशी आणि कुलकर्ण्यांनी केली. तुम्हाला माहिती आहे की, बिघडलेला गाव सुधरायचा असेल तर पाटील आणि कुलकर्त्यांना युती करावीच लागते", असं 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले. साताऱ्यातील 'स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी'त शुक्रवारी (दि. २) संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा : भरदिवसा मनसे नेत्याची हत्या, बिनविरोध निवडणूक होण्यासाठी वाद अन् धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं
आजच्यासारखे पटसंख्येचे जाचक नियम त्याकाळी असते, तर माझी शाळा कधीच बंद झाली असती
विश्वास पाटील म्हणाले, 'मी ज्या शाळेत शिकलो, त्या वर्गाचा पट केवळ पाच होता. जर आजच्यासारखे पटसंख्येचे जाचक नियम त्याकाळी असते, तर माझी शाळा कधीच बंद झाली असती आणि मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांची होणारी गळती थांबविणे ही केवळ सरकारचीच नव्हे, तर समाजाचीही नैतिक जबाबदारी आहे. मराठी शाळा चालायलाच हवी, कारण उद्याचा ज्ञानेश्वर किंवा तुकोबा याच मराठी शाळांमधून घडणार आहेत.
बळीराजाच्या आत्महत्यांचे सत्र हे केवळ राजकीय पक्षांचे नव्हे, तर लेखक आणि कलावंतांचेही अपयश आहे. शेतकऱ्याच्या मातेचा आणि पत्नीचा सन्मान व्हायला हवा. शासनाने 'लाडक्या बहिणी'प्रमाणेच 'लढाऊ धरतीमाता' नावाची नवी योजना राबवून शेतकरी महिलांना बळ द्यावे, अशी मागणीही विश्वास पाटील यांनी केली.










