Govt Job: वैद्यकीय क्षेत्रात नोकरी हवीये? PGIMER कडून बंपर भरती... 10 वी पास उमेदवारांना सुद्धा संधी

मुंबई तक

पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च PGIMER कडून ग्रुप A,B आणि C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार PGIMER च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात.

ADVERTISEMENT

PGIMER कडून बंपर भरती...
PGIMER कडून बंपर भरती...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी

point

PGIMER कडून बंपर भरती...

point

10 वी पास उमेदवारांना सुद्धा सहभागी होण्याची संधी

Govt Job: वैद्यकीय क्षेत्रांत सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च PGIMER कडून ग्रुप A,B आणि C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार PGIMER च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 1 जानेवारीपासून सुरू झाली. उमेदवार 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 

अर्जाचं शुल्क 

प्रवर्गानुसार, उमेदवारांसाठी अर्जाचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी 1500 रुपये शुल्क तसेच एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये अर्जाचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, अपंग उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात सूट देण्यात आली आहे. 

पात्रता आणि वयोमर्यादा 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा: 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार! नंतर, छतावरून खाली फेकलं अन्... आरोपी तरुणांचं निर्दयी कृत्य

कशी होईल निवड? 

ग्रुप A पदांसाठी 85 गुणांची परीक्षा उमेदवारांसाठी आयोजित केली जाणार आहे. यामध्ये, उमेदवारांना 85 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. यासोबतच, लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना 15 गुणांच्या मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. तसेच, ग्रुप B आणि C पदांसाठी 100 गुणांची परीक्षा उमेदवारांसाठी आयोजित केली जाणार असून यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न उमेदवारांना विचारले जातील. परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp