6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार! नंतर, छतावरून खाली फेकलं अन्... आरोपी तरुणांचं निर्दयी कृत्य
2 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास नराधमांनी पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं. राजू आणि वीरू कश्यप नावाच्या तरुणांनी मुलीवर बलात्कार करून नंतर तिला निर्दयीपणे छतावरून खाली फेकलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार!
नंतर, छतावरून खाली फेकलं अन्...
आरोपी तरुणांचं निर्दयी कृत्य
Gang Rape: एका 6 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे घडली असून काल म्हणजेच 2 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास नराधमांनी पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं. राजू आणि वीरू कश्यप नावाच्या तरुणांनी मुलीवर बलात्कार करून नंतर तिला निर्दयीपणे छतावरून खाली फेकलं. गंभीररित्या जखमी झालेल्या पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी त्यांना घेरलं परंतु, तेव्हा आरोपी तरुणांनी गोळीबार केला, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांकडून दोघांच्याही पायात गोळी झाडण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
पीडिता खेळत असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यात बिल्डिंगमध्ये भाडेतत्त्वार राहणाऱ्या राजू आणि वीरू कश्यप तरुणांनी मिळून पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं. राजू हा बलरामपूरचा रहिवासी असून वीरू लखीमपूरचा रहिवासी असल्याची माहिती आहे. पीडिता गच्चीवर खेळत असताना दोन्ही वासनांध तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिला इमारतीच्या छतावरून खाली फेकलं. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. तक्रारीच्या आधारे, आरोपींवर पॉक्सो अॅक्ट आणि बीएनएसच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा: मुंबई : इमारतीतून धूर अन् आग लागल्याचा संशय; पोलीस खोलीत पोहोचले पण भलतंच प्रकरण निघालं...
पोलिसांनी घेरलं असता गोळीबार अन्...
पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपीला पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान, दोन्ही आरोपी कावरा रोडवरील एका निर्माणाधीन कॉलनीमध्ये लपून बसल्याची पोलिसांना माहिती मिळाली. मात्र, पोलिसांनी त्यांना सरेंडर करण्यास सांगितलं असताना त्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी सुद्धा आरोपीच्या पायावर गोळ्या झाडल्या आणि यामध्ये दोन्ही आरोपी जखमी झाले. सध्या, रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: गडचिरोली: प्रसूतीसाठी गर्भवतीची 6 किमी पायपीट... आधी बाळ गेलं अन् नंतर आईचाही दुर्दैवी अंत!
चौकशीदरम्यान, आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला छतावरून फेकून तिची हत्या केल्याचं कबूल केलं. पीडिता त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगून टाकेल, या भितीने त्यांनी तिला छतावरून खाली फेकलं. आता, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस आरोपींवर पुढील कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे.










