वहिनीची विटेने ठेचून निर्घृण हत्या... हत्येनंतर, दिराने 25 फुटावरुन मारली उडी; दिराच्या भयंकर कृत्यमागचं कारण काय?

मुंबई तक

दिरानेच आपल्या वहिनीची निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वत: 25 फूट उंच छतावरून उडी मारल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं.

ADVERTISEMENT

वहिनीची विटेने ठेचून निर्घृण हत्या...
वहिनीची विटेने ठेचून निर्घृण हत्या...
google news

बातम्या हायलाइट

point

वहिनीची विटेने ठेचून निर्घृण हत्या...

point

नंतर दिराने 25 फुटावरुन मारली उडी

point

दिराच्या भयंकर कृत्यमागचं कारण काय?

Crime News: उत्तर प्रदेशातील बागपत येथे नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिरानेच आपल्या वहिनीची निर्घृण हत्या केली आणि नंतर स्वत: 25 फूट उंच छतावरून उडी मारल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

नेमकं काय घडलं? 

वृत्तानुसार, कोतवाली खेकडा येथील सांकरौद गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेने गावकऱ्यांमध्ये एखच खळबळ उडाली. साहिल नावाच्या तरुणाने त्याची वहिनी चंचल हिच्यावर विटेने वार करून तिची निर्दयीपणे हत्या केली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, वहिनीच्या हत्येनंतर आरोपी तरुणाने स्वत: 25 फूट उंचीवरून उडी मारली. त्यानंतर, तो गंभीररित्या जखमी झाला असून सध्या त्याचे मेरठच्या हायर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तसेच, हत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस आता आरोपी तरुण शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत. या भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा: 'मला मूव्ह ऑन करता येत नाही; तो मला शोधेल?' ब्रेकअपनंतर सुप्रसिद्ध युट्यूबरची आत्महत्या! आईला शेवटचा मॅसेज...

पीडित महिला चंचलचं दोन वर्षांपूर्वी आरोपी साहिलच्या भावासोबत लग्न झालं होतं. घटनेच्या दिवशी, साहिलने त्याच्या आईला दूध आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठवलं. त्यावेळी, घरात कोणी नसताना तो वहिनीच्या खोलीत गेला आणि तिच्यावर विटेने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर, वहिनीच्या हत्येनंतर साहिलने स्वत: 25 फूट उंचीवरून उडी मारून आत्महत्या केली. 

हे ही वाचा: मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवालांची निर्दोष मुक्तता, निकालानंतर अश्रूंचा बांध फुटला; मोदी आणि शहांबद्दल काय म्हणाले?

आता प्रश्न असा आहे की, अखेर साहिलने हे टोकाचं पाऊल का उचललं? हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून कुटुंबातील सदस्य देखील बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं सांगितलं जात आहे. सध्या, पोलीस आरोपी तरुण शुद्धीवर येण्याच्या प्रतिक्षेत आहेत, जेणेकरून सत्य घटना लवकरच उघडकीस येईल. पोलीस आता या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि आरोपीच्या जबाबानंतर या खळबळजनक हत्याकांडाचं कारण स्पष्ट होईल. 

हे वाचलं का?