प्रेग्नंट प्रेयसीला संपवण्यासाठी प्रियकराने रचला भयानक कट, आधी विषारी पाणीपुरी खाऊ घातली मग जंगलात नेऊन...
Crime News : एका प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्याची प्रेयसी गरोदर राहिली. यामुळे तो त्रासला होता. आठ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीला वाटेतून हटवण्यासाठी तिची हत्या करण्याचा भयानक कट रचला. पाणीपुरीत विष घालून त्याने तिला खायला दिली. यानंतर तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तिला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने प्रियकराने गाडीवर बसवून दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने तिला जंगलात नेले. यानंतर जे घडलं ते सगळंच भयानक होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेग्नंट प्रेयसीला संपवण्यासाठी प्रियकराने रचला भयानक कट,
आधी विषारी पाणीपुरी खाऊ घातली मग जंगलात नेऊन...
Crime News : एका प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्याची प्रेयसी गरोदर राहिली. यामुळे तो त्रासला होता. आठ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीला वाटेतून हटवण्यासाठी तिची हत्या करण्याचा भयानक कट रचला. पाणीपुरीत विष घालून त्याने तिला खायला दिली. यानंतर तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तिला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने प्रियकराने गाडीवर बसवून दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने तिला जंगलात नेले. यानंतर जे घडलं ते सगळंच भयानक होतं. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
हे ही वाचा : मेहुण्याला मटण खायला बोलवलं अन् डोक्यात तवा घालून केली हत्या, नेमकं काय घडलं?
पीडिता आठ महिन्यांची गरोदर
झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील ही घटना आहे.साकेत केशरी आणि पीडित तरुणीचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वर्षभरापूर्वी त्यांना एक मूलही झाले होते, परंतु गावकरी आणि समाजाच्या हस्तक्षेपानंतर दोघांना वेगळे करण्यात आले होते. त्यानंतर काही काळ त्यांच्या भेटीगाठींवर बंदी घालण्यात आली होती. आरोपानुसार, काही महिन्यांनंतर आरोपीने पुन्हा तरुणीशी संपर्क साधला आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. यामुळे पीडिता पुन्हा गरोदर राहिली असून सध्या ती आठ महिन्यांची गरोदर आहे.
पाणीपुरीत घातले विष
घटनेच्या दिवशी म्हणजेच 21 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी साकेतने पीडितेशी संपर्क साधला आणि तिला काहीतरी खाऊ घालण्याच्या बहाण्याने बोलावले. पीडितेने पाणीपुरी खाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याने तिला पाणीपुरी खाऊ घातली, ज्यामध्ये आधीच विष मिसळले होते. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या आणि तोंडातून रक्त येऊ लागले. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्याने डॉक्टरकडे नेण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवर बसवले, परंतु तिला रुग्णालयात नेण्याऐवजी तो जंगलात घेऊन गेला.










