मेहुण्याला मटण खायला बोलवलं अन् डोक्यात तवा घालून केली हत्या, नेमकं काय घडलं?
Crime News : अनेकदा पैशामुळे वाद उद्भवतात. किरकोळ रकमेवरुनदेखील हत्या झाल्याचं आपण ऐकतो. आता निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून एक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. एका मेहुण्याने दुसऱ्या मेहुण्याची डोक्यात तवा घालून हत्या केली आहे. बुधवारी (25 फेब्रुवारी) रात्री त्यांनी त्यांच्या मेहुण्याला मटणाच्या जेवणासाठी बोलावलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये पैशांवरुन जोरदार वाद झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मेहुण्याला मटण खायला बोलवलं अन् डोक्यात तवा घालून केली हत्या
नेमकं काय घडलं?
Crime News : अनेकदा पैशामुळे वाद उद्भवतात. किरकोळ रकमेवरुनदेखील हत्या झाल्याचं आपण ऐकतो. आता निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून एक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. एका मेहुण्याने दुसऱ्या मेहुण्याची डोक्यात तवा घालून हत्या केली आहे. कालीचरण भुईया असं मृत व्यक्तीचं नाव आहे. बुधवारी (25 फेब्रुवारी) रात्री त्यांनी त्यांच्या मेहुण्याला मटणाच्या जेवणासाठी बोलावलं होतं. त्यावेळी दोघांमध्ये पैशांवरुन जोरदार वाद झाला. याच वादात जेवायला आलेल्या मेहुण्याने भुईया यांच्या डोक्यात तवा घालून हत्या केली. बिहारच्या जुमई जिल्ह्यातील ही घटना आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.
हे ही वाचा : बेडरुमध्ये गेला अन् 32 वर्षाच्या मामीला मागून धरलं, वासनांध भाच्याने थेट...
मटणाचा बेत
कालीचरण भुईया हे एका कोळसा खाणीतून तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना मोठा फंड मिळाला होता. या फंडाच्या पैशावर त्यांचा मेहुणा तोता मांझी याचा डोळा होता. बुधवारी रात्री भुईया यांनी मटणाचा बेत करुन मांझी यांना जेवायला बोलावले होते. मात्र यावेळी दोघांमध्ये पैशांवरुन जोरदार वाद झाला. यावेळी कालीचरण यांनी आपली पत्नी आणि आरोपीच्या बहिणीला कानाखाली मारली. यामुळे तोता मांझी संतप्त झाला.
डोक्यात तवा घालून हत्या
संतप्त झालेल्या तोता मांझीने स्वयंपाकघरातील तवा घेतला आणि तो थेट मेहुण्याच्या म्हणजेच भुईया यांच्या डोक्यात घातला. यामध्ये भुईया यांचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेला मांझी घटनास्थळावरुन फरार झाला. मृताच्या पुतण्याने सांगितल्याप्रमाणे, 'भुईया यांना सेवानिवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळाली होती. त्या रकमेवर मांझीचा डोळा होता. यातूनच ही हत्या झाली. यानंतर मांझी फरार झाला.'










