बेडरुमध्ये गेला अन् 32 वर्षाच्या मामीला मागून धरलं, वासनांध भाच्याने थेट...
Nagpur Crime news: नागपूरमध्ये एक अत्यंत लज्जास्पद प्रकरण समोर आलं आहे. जिथे एका 30 वर्षीय भाच्याने आपल्या मामीसोबतच अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

नागपूर: नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 32 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या 30 वर्षीय भाच्यावर अश्लील कृत्य आणि छेडछाड करण्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीची आपल्याच मामीवर वाईट नजर होती. त्यामुळे त्याने अशाप्रकारचं घृणास्पद कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
वासनांध भाच्याने मामीसोबत नेमकं काय केलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता यशोधरानगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. 15 फेब्रुवारीच्या दुपारी ती आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्याचवेळी तिचा भाचा खोलीत उपस्थित होता आणि बेडवर झोपला होता. जसजशी महिला कपडे घेऊन खोलीतून बाहेर पडत होती, तेव्हाच आरोपी भाच्याने मागून जाऊन आपल्या मामीला पकडण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याच्या या कृत्याला ताबडतोब विरोध केला आणि तिने त्याच्या हेतूंबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर आरोपी काही न बोलता तेथून निघून गेला.
हे ही वाचा>> बायकोला बघताच नवऱ्यात राक्षस जागा झाला, गुप्तांगात बाटली घालत कुऱ्हाडीने केले 12 तुकडे
घटनेच्या काही दिवसांनंतर, 24 फेब्रुवारीच्या सकाळी जेव्हा मामी घरात एकटी होती, तेव्हा आरोपी भाचा पुन्हा घरात आला. यावेळी त्याने थेट बेडरूममध्ये जाऊन मामीला मागून घट्ट पकडले आणि अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देखील मामीने धैर्य दाखवत त्याला धक्का देऊन स्वतःला सोडवलं आणि ती बाहेर पळून गेली.
यानंतर पीडितेने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात छेडछाडीशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणाची तपासणी सुरू असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे.










