मुंबई : इमारतीतून धूर अन् आग लागल्याचा संशय; पोलीस खोलीत पोहोचले पण भलतंच प्रकरण निघालं...

मुंबई तक

नागपाडा परिसरातील एका बीएमसीच्या इमारतीतून धूर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज बांधून नागपाडा पोलीस दलाचे पथक तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, ती आग नसून भलतंच प्रकरण निघालं.

ADVERTISEMENT

भलतंच प्रकरण निघालं... (AI फोटो)
भलतंच प्रकरण निघालं... (AI फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इमारतीतून धूर अन् आग लागल्याचा संशय

point

पोलीस खोलीत पोहोचले पण भलतंच प्रकरण निघालं...

Mumbai: मुंबईमध्ये एका आगळ्यावेगळ्या गुन्ह्याची घटना समोर आली आहे. नागपाडा परिसरातील एका बीएमसीच्या इमारतीतून धूर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज बांधून नागपाडा पोलीस दलाचे पथक तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, तिथे आग लागलेली नव्हती, तर बिल्डिंगच्या रूम नंबर 16 मध्ये तीन युवक सोने वितळवण्यासाठी यंत्राचा वापर करत असल्याचे दिसून आलं. 

संबंधित घटना 28 डिसेंबर रोजी ही कामाठीपुराच्या सुखलाजी स्ट्रीटवरील बीएमसी इमारतीत घडली असून पोलिसांनी त्या तरुणांकडे सोने वितळवण्याचा परवाना आहे का, याची विचारणा केली. त्यांच्याकडे कोणतंही वैध कागदपत्र नसल्याचे उघडकीस आलं. त्यांची झडती घेतल्यानंतर सुमारे दोन कोटी रुपयांच्या किमतीचे सोने जप्त करण्यात आलं. यासंबंधी वैध बिले किंवा इतर पुरावे सादर करण्यासाठी पोलिसांनी त्यांना वेळ दिला. परंतु, दिलेल्या वेळेत ते कोणतेही दस्तऐवज दाखवू शकले नाहीत. त्यामुळे, पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून सोन्यासह ते वितळवण्याचं मशीन आणि इतर उपकरणेही जप्त करण्यात आली. 

हे ही वाचा: गडचिरोली: प्रसूतीसाठी गर्भवतीची 6 किमी पायपीट... आधी बाळ गेलं अन् नंतर आईचाही दुर्दैवी अंत!

सोन्याच्या तस्करीशी संबंधित प्रकरण 

पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता हे प्रकरण सोन्याच्या तस्करीशी संबंधित असल्याचं समोर आलं. प्रकरणातील आरोपी परदेशातून ओल्या पावडरच्या स्वरूपात सोने भारतात आणायचे. विमानतळावर सीमाशुल्क विभाग आणि सुरक्षा यंत्रणांच्या नजरेला चुकवण्यासाठी ते हे सोने कपड्यांमध्ये लपवून आणायचे आणि नंतर नागपाडा येथील या खोलीत मशीनच्या साहाय्याने ते सोने घन स्वरूपात रूपांतरित करून बाजारात पुरवठा केला जायचा. 

हे ही वाचा: धक्कादायक! नागपुरात आई-वडिलांनी पोटच्या 12 वर्षीय मुलाला साखळी अन् कुलपाने बांधून ठेवलं, अंगावर जखमा

संबंधित घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. तस्करीच्या या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. नागपाडा पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, तस्करीचे मार्ग आणि इतर संशयितांना शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ही कारवाई सोन्याच्या अवैध व्यापाराला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp