राज्यात 'या' भागात हिवाळ्यात अवकाळी पावसाची दाट शक्यता, तर काही ठिकाणी थंडीचा कडाका
Maharashtra Weather : राज्यात 3 जानेवारी रोजी हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहण्याची शक्यता अधिक आहे. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी मुंबईसह कोकणात झालेल्या काही प्रमाणातील अवकाळी पावसानंतर हवामान पूर्वस्थितीत आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात 3 जानेवारी रोजी हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहण्याची शक्यता
मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather : राज्यात 3 जानेवारी रोजी हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहण्याची शक्यता अधिक आहे. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी मुंबईसह कोकणात झालेल्या काही प्रमाणातील अवकाळी पावसानंतर हवामान पूर्वस्थितीत आलं आहे. अशातच राज्यातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता कमी असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चला तर 3 जानेवारी रोजी राज्यातील हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊयात.
हे ही वाचा : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या विजयाचा मार्ग मोकळा? 'एवढे' उमेदवार बिनविरोध विजयी
कोकण विभाग :
कोकण या विभागात काही प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच मुंबईसह उपनगरांत हलक्या धुक्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान हे 29 ते 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 10 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात देखील ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. सकाळी धुक्यासह थंडावा जाणवणार आहे. तसेच काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच परिसरात मुख्यत्वे कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात काही प्रमाणात अवकाळी पावसाचा इशारा आहे. बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होईल असा अंदाज वर्तवला. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.










