अस्थी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू, विदर्भातील घटना
Chandrapur News : विरूर येथील रहिवासी मधुकर पत्रू उपरे (वय 65) हे आपल्या नातेवाइकांच्या अस्थी विसर्जनासाठी कुटुंबीयांसह वर्धा नदीकाठी आले होते. दुपारच्या सुमारास विधी पूर्ण करण्यासाठी ते नदीत उतरले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही वेळातच मधुकर उपरे हे पाण्याच्या प्रवाहात पुढे गेले आणि नातेवाइकांच्या नजरेआड झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अस्थी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू, विदर्भातील घटना
नदीतील पाण्याची पातळी आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना
वरोरा (चंद्रपूर) : धार्मिक विधीसाठी वर्धा नदीवर गेलेला एक जण काळाच्या पडद्याआड गेला. तुळाना गावाजवळील वर्धा नदीत अस्थी विसर्जन करताना पाण्यात उतरलेल्या वृद्धाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.2) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विरूर येथील रहिवासी मधुकर पत्रू उपरे (वय 65) हे आपल्या नातेवाइकांच्या अस्थी विसर्जनासाठी कुटुंबीयांसह वर्धा नदीकाठी आले होते. दुपारच्या सुमारास विधी पूर्ण करण्यासाठी ते नदीत उतरले. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही वेळातच मधुकर उपरे हे पाण्याच्या प्रवाहात पुढे गेले आणि नातेवाइकांच्या नजरेआड झाले. बराच वेळ उलटूनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी घाबरून शोध सुरू केला.
नदीकाठी आणि आसपासच्या परिसरात पाहणी करूनही त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही. यानंतर नातेवाइकांनी तातडीने वरोरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. नदीचा प्रवाह, पाण्याची खोली आणि आजूबाजूचा परिसर लक्षात घेऊन शोध कार्य राबवण्यात आले. काही वेळाच्या शोधानंतर मधुकर उपरे यांचा मृतदेह नदीतील त्याच भागात आढळून आला. त्यांना तत्काळ पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. प्राथमिक पाहणीत बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.










