कोल्हापूर : शेकोटीसाठी रस्त्याच्या बाजूला थांबले, इनोव्हा कार आली चिरडून गेली, तावडे हॉटेल चौकात तिघांचा मृत्यू

मुंबई तक

Kolhapur Innova car accident News : . मंगळवारी पहाटे काही जण थंडीमुळे रस्त्याच्या बाजूला थांबून शेकोटी करत होते. याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अन् त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना चिरडलं.

ADVERTISEMENT

Kolhapur Innova car accident News
Kolhapur Innova car accident News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : शेकोटीसाठी रस्त्याच्या बाजूला थांबले,

point

इनोव्हा कार आली चिरडून गेली, तावडे हॉटेल चौकात तिघांचा मृत्यू

Kolhapur Innova car accident News, कोल्हापूर : कोल्हापुरात बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. बेदरकारपणे गाडी चालवल्याने पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल चौकात भीषण अपघात घडला आहे. थंडीपासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला शेकोटी करत उभ्या असलेल्या तिघांना भरधाव इनोव्हा कारने चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तावडे हॉटेल चौक हा पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वर्दळीचा परिसर आहे. पहाटेच्या वेळेत वाहतूक तुलनेने कमी असली तरी, भरधाव जाणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे वारंवार दिसून येते. मंगळवारी पहाटे काही जण थंडीमुळे रस्त्याच्या बाजूला थांबून शेकोटी करत होते. याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अन् त्याने थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना चिरडलं.

हेही वाचा : BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी आली समोर, पाहा तुमच्या वॉर्डात कोण आहे उमेदवार

अपघाताची तीव्रता इतकी होती की, तिघेही जण कारच्या धडकेत दूर फेकले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काहींनी जखमींच्या मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp