38 वर्षीय महिलेचा समलिंगी नवरा; तरीही महिलेने दिला बाळाला जन्म…
अमेरिकेतील सामंथा विन ग्रीनस्टोन या 38 वर्षीय महिलेने नुकताच पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनाची कहाणी ऐकून लोक थक्क होत आहेत. सामंथाचा नवरा जेकब हॉफ हा स्वतः समलैंगिक असल्याचा दावा करतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
38 वर्षीय महिलेचा समलिंगी नवरा...
तरीही एकनिष्ठ प्रेम अन् नव्याने बाळाचा जन्म
Viral Story: अमेरिकेतील सामंथा विन ग्रीनस्टोन या 38 वर्षीय महिलेने नुकताच पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनाची कहाणी ऐकून लोक थक्क होत आहेत. सामंथाचा नवरा जेकब हॉफ हा स्वतः समलैंगिक असल्याचा दावा करतो मात्र, तरीही दोघांचं एकमेकांवर एकनिष्ठ प्रेम आहे. त्यांनी एकमेकांसोबत लग्न केलं आणि आता एका बाळाला जन्म दिला आहे.
स्ट्रेट महिला आण गे पुरुषाची लव्ह स्टोरी
खरं तर, 2015 दोघांची भेटमध्ये एका थिएटर नाटकाच्या ऑडिशन दरम्यान झाली. सुरुवातीला ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. कालांतराने, त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. जेकबने सामंथाला 2023 मध्ये प्रपोज केलं आणि 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यात फ्लोरिडामध्ये पारंपरिक यहुदी रितीरिवाजाने लग्न केलं. सामंथा ही स्ट्रेट असून जेकब स्वत: गे असल्याचं म्हणवतो. परंतु असं असूनही ते एकनिष्ठ नातं जगत आहेत. सामंथाने सोशल मीडियावर याबाबतीत सांगितले की, तिच्या वयामुळे लोक तिला तिच्या बाळाची आजी समजतात. गरोदरपणात आणि स्तनपान करताना तिने बोटॉक्स केलं नाही. डिलिव्हरीनंतर रक्त संक्रमण (ब्लड ट्रान्सफ्यूजन) ही घ्यावं लागले. मात्र या गोष्टी ती हसतमुखाने घेते.
हे ही वाचा: हनीमूनच्या रात्री बायको वाट पाहून थकली अन् सकाळी नवरा जाऊबाईच्या खोलीतून बाहेर येताना दिसला...
'बर्ड्स अँड बीज' प्रमाणे बाळाचं प्लॅनिंग
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांनी IVF किंवा वैद्यकीय मदत न घेता नैसर्गिक पद्धतीने ('बर्ड्स अँड बीज' प्रमाणे) बाळाचं प्लॅनिंग केलं. सामंथा म्हणाली की, "आम्ही प्रेमात आहोत आणि म्हणूनच आम्ही एकमेकांसोबत आहोत." काही लोक त्यांच्या लग्नाला 'लॅव्हेंडर मॅरिज' म्हणजे दिखाव्याचं लग्न म्हणतात, पण दोघांनी याला ठाम नकार दिला. ते म्हणाले की, हे खरं प्रेम आहे आणि यात ते पूर्णपणे समाधानी आहेत.
हे ही वाचा: बर्थडे पार्टीत हत्येचा थरार! दाजीनेच चाकू भोसकून केला मेहुण्याचा खून; डान्स करण्यावरून वाद अन्...
आता, जन्मलेल्या बाळासह ते दोघे त्यांचं जीवन आनंदात जगत आहेत. जेकब आणि सामंथाच्या प्रेमाचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देत असून सध्या, त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे.










