बीड: 9 वी शिकणाऱ्या तरुणीचं टोकाचं पाऊल! पंख्याला गळफास घेत केली आत्महत्या...
बीड जिल्ह्यात एका 9 वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय तरुणीने स्वत:चं आयुष्य संपवल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित घटना ही जिल्ह्याच्या केज तालुक्यातील तांबवा गावात घडल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
9 वी शिकणाऱ्या तरुणीने उचललं टोकाचं पाऊल!
पंख्याला गळफास घेत केली आत्महत्या...
Beed Crime: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. येथे एका 9 वीत शिकणाऱ्या 14 वर्षीय तरुणीने स्वत:चं आयुष्य संपवल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित घटना ही जिल्ह्याच्या केज तालुक्यातील तांबवा गावात घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
पंख्याला गळफास घेत पीडितेचं टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबर रोजी पीडित तरुणी घरात होती आणि त्याच वेळी तिने आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेत हे टोकाचं पाऊल उचललं. पीडितेने आत्महत्या केल्याचं कळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. दरम्यान, मृत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो केज उप-जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
हे ही वाचा: सातारा : हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टची पार्टी, बाहेर येताच तरुणाने अंधाऱ्या वाटेत पाय टाकला, थेट 400 फुट खोल दरीत कोसळला
घटनेमागचं नेमकं कारण काय?
तसेच, पीडितेने हे टोकाचं पाऊल का उचललं? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणासंबंधी सध्या कुटुंबातील सदस्य आणि आसपासच्या स्थानिकांची चौकशी केली जात आहे. पीडित तरुणीला कोणत्या प्रकारचा मानसिक तणाव, कौटुंबिक समस्या किंवा इतर दबाव होता का? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा: 'रात्री 12 वाजता बॉम्बस्फोट होणार..', संजय राऊतांच्या घराबाहेरच्या कारवर मजकूर कोणी लिहिला? चौकशीत मोठा खुलासा
तज्ज्ञांचं मत
या धक्कादायक घटनेनंतर, गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. स्थानिकांना सुद्धा या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. किशोरावस्थेत मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे आणि यामध्ये कुटुंबियांची तसेच समाजाची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. सध्या, प्रकरणाचा तपास सुरू असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सच्या आधारे आणि तपासानंतर, पीडितेच्या या कृत्यामागचं नेमकं कारण समोर येईल.










