सातारा : हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टची पार्टी, बाहेर येताच तरुणाने अंधाऱ्या वाटेत पाय टाकला, थेट 400 फुट खोल दरीत कोसळला

इम्तियाज मुजावर

Satara Accident News : 31 डिसेंबरच्या रात्री क्षेत्रमाहुली येथील आदित्य कांबळे हा तरुण मित्रांसोबत कास पठाराच्या दिशेने असलेल्या एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. पार्टी आटोपल्यानंतर आदित्य हॉटेलच्या बाहेर आला. परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने आणि दरीचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला.

ADVERTISEMENT

Satara Accident News
Satara Accident News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सातारा : हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टची पार्टी,

point

बाहेर येताच तरुणाने अंधाऱ्या वाटेत पाय टाकला

point

थेट 400 फुट खोल दरीत कोसळला

Satara Accident News, सातारा : थर्टी फर्स्टची पार्टी जल्लोषात सुरु असतानाच साताऱ्यात एका युवकाला अंधाऱ्या वाटेत जाणे चांगलचं भोवलंय. 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक तरुण त्याच्या मित्रांसोबत कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. मात्र, तरुण हॉटेलच्या बाहेर येताच अंधाराचा अंदाज न आल्याने थेट चारशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून मध्यरात्री उशिरा छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने त्याला दरीतून बाहेर काढण्यात आले.

साताऱ्यातील कास पठार परिसर हा निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, काही ठिकाणी रस्त्यालगत खोल दऱ्या असून रात्रीच्या वेळी येथे विशेष काळजी घेणे आवश्यक असते. 31 डिसेंबरच्या रात्री क्षेत्रमाहुली येथील आदित्य कांबळे हा तरुण मित्रांसोबत कास पठाराच्या दिशेने असलेल्या एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. पार्टी आटोपल्यानंतर आदित्य हॉटेलच्या बाहेर आला. परिसरात पुरेसा प्रकाश नसल्याने आणि दरीचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला आणि तो थेट सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला.

हेही वाचा : BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेची संपूर्ण यादी आली समोर, पाहा तुमच्या वॉर्डात कोण आहे उमेदवार

तरुण दरीत पडल्याची माहिती मित्रांना मिळताच एकच गोंधळ उडाला. तातडीने स्थानिक नागरिकांसह छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स या आपत्ती व्यवस्थापन व ट्रेकिंगमध्ये कार्यरत असलेल्या संस्थेला याची माहिती देण्यात आली. रात्रीची वेळ, अंधार आणि खोल दरी यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण होते. मात्र, माहिती मिळताच ट्रेकर्सचे कार्यकर्ते आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp