हनीमूनच्या रात्री बायको वाट पाहून थकली अन् सकाळी नवरा जाऊबाईच्या खोलीतून बाहेर येताना दिसला...
एक महिला लग्न होऊन तिच्या पतीसोबत सासरी आली. मात्र, हनीमूनच्या रात्री तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. त्या दिवशी, तिने संपूर्ण रात्र नवऱ्याची वाट पाहिली, पण तो खोलीत आलाच नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हनीमूनच्या रात्री बायको वाट पाहून थकली अन्...
सकाळी नवरा जाऊबाईच्या खोलीतून बाहेर येताना दिसला...
Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक महिला लग्न होऊन तिच्या पतीसोबत सासरी आली. मात्र, हनीमूनच्या रात्री तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. त्या दिवशी, तिने संपूर्ण रात्र नवऱ्याची वाट पाहिली, पण तो खोलीत आलाच नाही. शेवटी, वाट पाहून थकली आणि झोपी गेली. पण सकाळी उठल्यावर तिने तिच्या नवऱ्याला तिच्या जाऊबाईच्या खोलीतून येताना पाहिलं. हे पाहून महिलेच्या पायाखालची जमिनच सरकली.
पती जावेच्या खोलीत झोपण्यासाठी जायचा
खरं तर, ही बाब केवळ त्या दिवसापुरतीच मर्यादित राहिली नाही तर दररोज असं घडत राहिलं. पीडितेचा पती तिच्या खोलीत अजिबात येत नव्हता. तो त्याच्या वहिनीच्या म्हणजेच महिलेच्या जाऊबाईच्या खोलीत झोपण्यासाठी जायचा. शेवटी, पीडिता या सगळ्याला वैतागली आणि तिने तिच्या पतीला याचा जाब विचारला. मात्र, त्यानंतर महिलेच्या नवऱ्याने आणि तिच्या जावेने मिळून तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर, तिला यासाठी घराबाहेर सुद्धा काढून टाकल्याचं सांगितलं जात आहे.
पतीवर जावेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप
अखेर, पीडित महिलेने पोलिसांची मदत घेण्याचं ठरवलं आणि तिने तिच्या पती, दीर आणि जाऊबाईविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून FIR दाखल केला. संबंधित घटना गोरखपूरच्या बेलीपार पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती आहे. येथे, एका 30 वर्षीय महिलेने आपल्या पतीवर जावेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. याव्यतिरिक्त, हुंड्यासाठी सुद्धा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं तिने सांगितलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: दादर स्थानकावरील गर्दी कमी होणार! रेल्वे आणखी एक नवं प्लॅटफॉर्म उभारणार...
महिलेने तक्रार करताना सांगितलं की, 13 जुलै 2025 रोजी बांसगाव पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत तिचं लग्न झालं. तसेच, तिचा पती अहमदाबादमध्ये एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, पीडिता तिच्या नवऱ्यासोबत सासरी आली. मात्र, हनीमूनच्या रात्री ती खोलीत तिच्या पतीची वाट पाहत होती. परंतु, तिचा पती त्यांच्या खोलीत गेला नाही. शेवटी, सकाळी पीडितेने तिच्या पतीला जाऊबाईच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिलं.










