पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी तुरुंगवास... जेलमधून सुटल्यानंतर, दुसऱ्या पत्नीला देखील सोडलं नाही; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

संजय कुमार नावाच्या एका व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नी रोशनी हिची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे. पीडित महिला ही आरोपी संजयची दुसरी पत्नी होती.

ADVERTISEMENT

दुसऱ्या पत्नीला देखील सोडलं नाही...
दुसऱ्या पत्नीला देखील सोडलं नाही...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी तुरुंगवास...

point

जेलमधून सुटल्यानंतर, दुसऱ्या पत्नीला देखील सोडलं नाही

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: उत्तर प्रदेशातील कानपुरच्या गुजैनी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून टाकलं आहे. संजय कुमार नावाच्या एका व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नी रोशनी हिची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे. पीडित महिला ही आरोपी संजयची दुसरी पत्नी होती. त्याच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या करून स्वत:चं आयुष्य संपवलं असून, त्या प्रकरणात संजयवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांच्या आधारे, त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने एका वर्षापूर्वी रोशनी नावाच्या महिलेसोबत लग्न केलं. 

पत्नीवर तव्याने वार करून हत्या...

लग्न झाल्यानंतर, संजय रोशनीला सतत त्रास देत होता. पतीच्या छळाला कंटाळून रोशनीने घर सोडलं आणि आपल्या बहिणीकडे राहू लागली. मात्र चार दिवसांपूर्वी संजय तिच्याकडे आला आणि सुखाने संसार करूया, असं सांगून तिला आपल्या घरी परत नेलं. कुटुंबीयांनी सुद्धा पीडितेची समजून काढून रोशनीला परत तिच्या सासरी पाठवलं. पण तरी सुद्धा त्या दोघांमध्ये सतत वाद होते. घटनेच्या दिवशी, पीडिता आणि आरोपीमध्ये असाच वाद झाला आणि त्यावेळी रागाच्या भरात पतीने रोशनीवर तव्याने वार करून निर्घृण हत्या केली. 

हे ही वाचा: चुलत बहिणीशीच पळून जाऊन केलं लग्न! शेवटी, झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह...

भावाने फोन केल्यानंतर घटना उघडकीस 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित रोशनीच्या भावाने तिला फोन केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यावेळी, पीडितेच्या भावाला आपल्या बहिणीचा फोन बंद असल्याचं समजलं आणि त्यानंतर, तो लगेच तिच्या घरी पोहोचला. मात्र, दाराला कुलूप लागलं होतं. त्याने, नातेवाइकांना बोलावून घराचा दरवाजा उघडला असता आत भयानक दृश्य दिसलं. घरात रोशनीचा मृतदेह आढळून आला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता, वाहतूक कोंडीची चिंता मिटणार! मुंबईतील 'या' खाडीवर बांधला जाणार पूल...

त्यानंतर, पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यांनी सुद्धा या प्रकरणाचा तपास सुरू केला. चौकशीदरम्यान, पीडितेच्या शेजाऱ्यांनी आरोपी संजयला घरातून पळून जाताना पाहिलं असल्याचं समोर आलं. रोशनीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवर पोलिसांनी संजयविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp