मुंबई: पहिल्या पतीपासून पोटगीची मागणी; पण, दुसऱ्या पतीच्या साक्षीमुळे खटल्याचा निकाल पलटला अन्...
मुंबईच्या बोरीवलीतील न्यायालयातून पती आणि पत्नीच्या वादाशी संबंधित एक अजब प्रकरण उघडकीस आलं आहे. एका अनपेक्षित साक्षीमुळे 17 वर्षे जुन्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याचा निकाल वेगळाच लागल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेने केली पहिल्या पतीपासून पोटगीची मागणी
पण, दुसऱ्या पतीच्या साक्षीमुळे खटल्याचा निकाल पलटला अन्...
मुंबईच्या बोरीवली कोर्टातील धक्कादायक प्रकरण
Mumbai Crime: मुंबईच्या बोरीवलीतील न्यायालयातून पती आणि पत्नीच्या वादाशी संबंधित एक अजब प्रकरण उघडकीस आलं आहे. एका अनपेक्षित साक्षीमुळे 17 वर्षे जुन्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्याचा निकाल वेगळाच लागल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात, महिलेच्या सध्याच्या पतीने न्यायालयात स्वतःच्या पत्नीविरुद्ध साक्ष दिली. त्यानंतर, न्यायालयाने महिलेचा तिच्या आधीच्या पतीविरुद्धचा कौटुंबिक हिंसाचार आणि पोटगीचा खटला रद्द केला.
पतीकडून पोटगीची मागणी...
मुंबईतील बोरीवली येथे असलेल्या मेजिस्ट्रेट कोर्टात हा खटला सुरू होता. 2009 मध्ये, महिलेने तिच्या पहिल्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महिलेने केलेल्या आरोपानुसार, लग्नानंतर बरीच वर्षे सासरी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. इतकेच नव्हे तर, तिला घराबाहेर सुद्धा काढण्यात आलं होतं. याची भरपाई म्हणून आणि तिच्या उदरनिर्वाहासाठी तिने तिच्या आधीच्या पतीकडून दरमहा एक ठराविक रकमेची मागणी केली होती.
महिलेने तिच्या याचिकेत म्हटलं की तिचं 2005 मध्ये अरेन्ज्ड मॅरेज झालं होतं. लग्नानंतर तिला कळलं की तिचा पती आधीच विवाहित होता आणि त्याची पहिली पत्नी नेहमी त्यांच्या घरी यायची. तसेच, तिचा पती आणि त्याची पहिली पत्नी दोघेही तिच्यावर अत्याचार करत असल्याचा आरोपी महिलेने केला. महिलेने तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार करण्यात आल्याचं कोर्टात सांगितलं. डिसेंबर 2009 मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल दिला आणि तिच्या पहिल्या पतीला पीडितेला दरमहा 3,200 रुपये द्यावे लागणार असल्याचा आदेश दिला. हा आदेश खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत लागू होता.
हे ही वाचा: नांदेडमधील चौकोनी कुटुंब मृत्यूप्रकरणात ट्वीस्ट, आई-वडिलांचा खून केला अन् मुलांनी स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिलं
महिलेच्या दुसऱ्या लग्नाशी संबंधित पुरावे सादर
संबंधित महिलेची बहीण तिच्या आरोपांचं समर्थन करण्यासाठी न्यायालयात साक्षीदार म्हणून हजर झाली. बचाव पक्षाने महिलेच्या दुसऱ्या लग्नाशी संबंधित पुरावे सादर केले. मॅरेज सर्टिफिकेट आणि तिच्या सध्याच्या पतीची माहिती कोर्टात पुरावे म्हणून सादर करण्यात आली. त्यानंतर, महिलेचा सध्याचा पती न्यायालयात हजर झाला आणि त्याने कबूल केलं की तो तिच्याशी कायदेशीररित्या विवाहित आहे. त्याच्या साक्षीने महिलेच्या दुसऱ्या लग्नाची पुष्टी झाली. बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की महिलेने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन पुन्हा लग्न केलं असल्याने, तिला आता त्याच्याकडून पोटगी मिळू शकत नाही.










