नांदेडमधील चौकोनी कुटुंब मृत्यूप्रकरणात ट्वीस्ट, आई-वडिलांचा खून केला अन् मुलांनी स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिलं
Nanded Crime : जवळा मुरार येथील शेतकरी रमेश लखे हे गेल्या सुमारे 25 वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या उपचारांचा मोठा खर्च कुटुंबावर येत होता. रमेश लखे यांची पत्नी राधाबाई लखे तसेच मुलगे बजरंग आणि उमेश हे मिळेल ते काम करून घरखर्च चालवत होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नांदेडमधील चौकोनी कुटुंब मृत्यूप्रकरणात ट्वीस्ट
आई-वडिलांचा खून केला अन् मुलांनी स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिलं
Nanded Crime ,नांदेड: जवळा मुरार गावात 25 डिसेंबर रोजी उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. एका घरात आई-वडिलांचे मृतदेह, तर काही अंतरावर रेल्वे पटरीवर दोन्ही मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आता पोलिस तपासातून या घटनेमागील भयावह सत्य समोर आले असून, आर्थिक विवंचनेतून दोन्ही सख्या भावांनी आधी आई-वडिलांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतः रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
जवळा मुरार येथील शेतकरी रमेश लखे हे गेल्या सुमारे 25 वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या उपचारांचा मोठा खर्च कुटुंबावर येत होता. रमेश लखे यांची पत्नी राधाबाई लखे तसेच मुलगे बजरंग आणि उमेश हे मिळेल ते काम करून घरखर्च चालवत होते. वडिलांच्या उपचारासाठी, रोजच्या गरजांसाठी आणि कर्जफेडीसाठी ही कुटुंबीयांची सतत धडपड सुरू होती.
मात्र उत्पन्न मर्यादित आणि खर्च वाढता असल्याने कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे हे कुटुंब मानसिक तणावाखाली होते. गेल्या काही दिवसांपासून घरात वैफल्याचे वातावरण होते, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. या परिस्थितीतून मार्ग न सापडल्याने दोन्ही भावांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात आहे.
घटनेपूर्वी त्यांनी आईच्या बहिणीच्या नातवाला, जो शिक्षणासाठी त्यांच्या घरी राहत होता, काही कारण सांगून गावी परत पाठवले होते. त्यामुळे या घटनेचे नियोजन अचानक नसून काही दिवसांपासून सुरू होते, असे तपासातून समोर आले आहे. ठरलेल्या योजनेनुसार बजरंग आणि उमेश या दोघांनी आधी वडील रमेश लखे आणि आई राधाबाई लखे यांचा घरातच गळा दाबून खून केला. त्यानंतर घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून ते दोघे मुगट रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाले.










