महिला शिवसैनिक नगरसेवक झाल्याच्या आनंदात, पण 5 दिवसांनी घात झाला, अज्ञातांनी केली पतीची हत्या

मुंबई तक

Raigad Crime News : , मंगेश काळोखे सकाळच्या वेळेत आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मुलाला शाळेत पोहोचवून परत येत असताना, आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

ADVERTISEMENT

Raigad Crime News
Raigad Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिला शिवसैनिक नगरसेवक झाल्याच्या आनंदात

point

पण 5 दिवसांनी घात झाला, अज्ञातांनी केली पतीची हत्या

Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील औद्योगिक नगरी खोपोलीत गुरुवारी सकाळी घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या अज्ञातांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे केवळ खोपोलीच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मंगेश काळोखे सकाळच्या वेळेत आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मुलाला शाळेत पोहोचवून परत येत असताना, आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार अज्ञात इसमांनी त्यांच्या दुचाकीचा रस्ता अडवला आणि काही सेकंदांतच तीक्ष्ण शस्त्रांनी सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की काळोखे रस्त्यावरच कोसळले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले, तर हल्लेखोर घटनास्थळावरून वाहनासह पसार झाले.

या घटनेची बातमी पसरताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणातच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मानसी काळोखे यांनी विजय मिळवला असल्याने, निवडणूक निकालातून निर्माण झालेला राजकीय वाद, जुने वैर किंवा दबाव यामागे कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. तसेच, ही हत्या सुपारी देऊन घडवून आणली असावी, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp