महाराष्ट्र हादरला, चौथीही मुलगीच झाल्याने विकृत बापाने चिमुकलीला क्रूरपणे संपवलं, डोक्यात लाकडी पाट घातला
Jalgaon Crime : कृष्णा लालचंद राठोड (वय 26, रा. मोराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी पहूर पोलिस ठाण्यात या नवजात बालिकेच्या मृत्यूची नोंद ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून करण्यात आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हादरला, चौथीही मुलगीच झाल्याने विकृत बापाने चिमुकलीला क्रूरपणे संपवलं,
डोक्यात लाकडी पाट घातला, जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट
Jalgaon Crime, जळगाव : मुलगा व्हावा या अंधश्रद्धा आणि मानसिकतेतून पुन्हा एकदा समाजाला हादरवणारी घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आधीच तीन मुली असताना चौथ्यांदा देखील मुलगी जन्माला आल्याच्या रागातून एका निर्दयी बापाने स्वतःच्या तीन दिवसांच्या नवजात कन्येची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मोराड (ता. जामनेर) येथे घडला. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, तब्बल सव्वा महिन्यानंतर पोलिसांच्या सखोल तपासातून हा खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाले असून, आरोपी वडिलाला अटक करण्यात आली आहे.
कृष्णा लालचंद राठोड (वय 26, रा. मोराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी पहूर पोलिस ठाण्यात या नवजात बालिकेच्या मृत्यूची नोंद ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून करण्यात आली होती. घरातील सदस्यांकडूनही बाळाचा अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणात कोणताही संशय व्यक्त करण्यात आला नव्हता.
मात्र, तपास पुढे सरकत असताना पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटू लागल्या. कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबांमध्ये वेळोवेळी बदल दिसून येत होते. बाळाच्या मृत्यूबाबत सांगितल्या जाणाऱ्या कारणांमध्ये एकवाक्यता नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याच दरम्यान शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलेल्या जखमांमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
हेही वाचा : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी?










