महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी?

मुंबई तक

Congress first candidate list for Kolhapur Mahapalika Election : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या राज्य निवड समितीची महत्त्वाची बैठक गुरुवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते.

ADVERTISEMENT

Congress first candidate list for Kolhapur Mahapalika Election :
Congress first candidate list for Kolhapur Mahapalika Election :
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

point

कोल्हापुरातील उमेदवार यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

Congress first candidate list for Kolhapur Mahapalika Election, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीतून पक्षाने नव्या चेहऱ्यांना मोठी संधी देत 29 उमेदवार प्रथमच मैदानात उतरवले आहेत. त्याचबरोबर अनुभवाला देखील महत्त्व देण्यात आले असून विधानसभा निवडणूक लढलेले राजेश भरत लाटकर, माजी उपमहापौर भूपाल शेटे, संजय मोहिते, मधुकर रामाणे, दीपा मगदूम, जयश्री चव्हाण तसेच मनसेचे जिल्हा प्रमुख राजू दिंडोर्ले यांच्यासह एकूण 16 माजी नगरसेवकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. महायुतीतील जागावाटपावरून अद्याप चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने ज्या जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत त्या जाहीर करत निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या राज्य निवड समितीची महत्त्वाची बैठक गुरुवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते. विधानपरिषदेच्या सूचनेनुसार तसेच गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, मालोजीराजे आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पहिल्या उमेदवार यादीला अंतिम मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्र. -                  आरक्षण -                                                    उमेदवाराचे नाव

2 -             नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -                                आरती दिपक शेळके

हे वाचलं का?

    follow whatsapp