Govt Job: स्पोर्ट्समध्ये करिअरची स्वप्नं पाहताय? मग, क्रीडा मंत्रालयाच्या 'या' नव्या योजनेसाठी करा अप्लाय...
क्रीडा (स्पोर्ट्स) क्षेत्रात करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून एक नवी इंटर्नशिप स्कीम लाँच करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
स्पोर्ट्समध्ये करिअरची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी
क्रीड मंत्रालयाच्या 'या' नव्या योजनेसाठी करा अप्लाय...
Govt Job: क्रीडा (स्पोर्ट्स) क्षेत्रात करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून एक नवी इंटर्नशिप स्कीम लाँच करण्यात आली आहे. यासाठी 5.3 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं असून यामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना स्टायपेंड सुद्धा दिलं जाणार आहे. या माध्यमातून तुम्हाला क्रीडा (स्पोर्ट्स) क्षेत्राशी संबंधित कार्याचा अनुभव घेण्याची आणि पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे.
क्रीडा मंत्र्यांनी दिली माहिती...
या इंटर्नशिप योजनेद्वारे, क्रीडा प्रशासन, विज्ञान आणि यासंबंधित क्षेत्रातील तज्ञांची एक चांगली टीम तयार करणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे. ज्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, असे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या मते, ही नवीन योजना खेळांच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासा महत्त्वाची भूमिका बजावेल.
या इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून, तब्बल 452 पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना MYAS आणि त्याच्याशी जोडलेल्या मुख्य संस्थांसोबत काम करण्याची संधी मिळेल.
तीन प्रमुख संस्थांचा समावेश
1. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI): भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतातील खेळांना प्रोत्साहन देते. ते प्रतिभावान खेळाडू समोर आणून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करते.










