बीड : विधवा महिलेवर बलात्कार, नराधमाने भाजी नेण्यास बोलावलं अन् कोणी नसल्याचं समजताच...
Beed Crime : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विधवा असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करून आपले जीवन जगत आहे. परिसरातीलच मधुकर उर्फ मदन मस्के (वय 57) याने आपल्या शेतात भाजीपाला तयार झाल्याचे सांगत तो घेऊन जाण्यासाठी तिला बोलावले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : विधवा महिलेवर बलात्कार
नराधमाने भाजी नेण्यास बोलावलं अन् कोणी नसल्याचं समजताच...
Beed Crime , रोहिदास हातागळे / बीड : केज तालुक्यातील एका गावात विधवा महिलेवर शेतात बोलावून घेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भाजीपाला देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला एकट्या ठिकाणी बोलावून तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 57 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विधवा असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करून आपले जीवन जगत आहे. परिसरातीलच मधुकर उर्फ मदन मस्के (वय 57) याने आपल्या शेतात भाजीपाला तयार झाल्याचे सांगत तो घेऊन जाण्यासाठी तिला बोलावले होते. ओळखीचा आणि विश्वासाचा फायदा घेत महिलेला शेतात बोलावून घेण्यात आले. मात्र, तेथे गेल्यानंतर तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घडलेल्या प्रकारानंतर मानसिक धक्का बसला असतानाही पीडित महिलेने धैर्य दाखवत थेट युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठले. तिने संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर कथन केला. महिलेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी विलंब न करता तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांतच आरोपी मधुकर मस्के याला ताब्यात घेतले.










