Survey: मुंबईत ठाकरेंना बसणार मोठा फटका, मुस्लिम मतदारांचा 'तो' निर्णय सेना-मनसेचं वाढवणार प्रचंड टेन्शन!
Thackeray Allaince: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदार हे निर्णायक भूमिका बजावू शकतात. पण नव्या सर्व्हेनुसार शिवसेना UBT आणि मनसेची युतीला मुस्लिम मतदार हे फारसा प्रतिसाद देणार नसल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election)पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची नुकतीच युती झाली असून, ते महाविकास आघाडी (MVA) पासून या निवडणुकीपुरता तरी दूर झाले आहेत. या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मुंबईतील मुस्लीम मतदारांची भूमिका काय असेल? याबाबत असेंडिया या कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. मुस्लीम मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनिश्चितता असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे बीएमसी निवडणुकीचे चित्र आणखी गुंतागुंतीचे होऊ शकते.
असेंडिया कंपनीने मुंबईतील महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर सर्व्हे केला असून, त्यात मुस्लीम मतदारांना "ठाकरे बंधूंची युती आणि एमव्हीएच्या ब्रेकअपनंतर तुम्ही कोणाला पाठिंबा देणार?" असा प्रश्न विचारण्यात आला. सर्व्हेच्या निकालानुसार, तब्बल 64% मुस्लीम मतदारांनी "काही सांगता येत नाही" असे उत्तर दिले आहे. हे प्रमाण इतके मोठे आहे की, ते निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. उर्वरित मतदारांच्या उत्तरांमध्येही विविधता दिसून येते, ज्यामुळे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण वाटते.
सर्व्हेचे प्रमुख निष्कर्ष:
1. माझ्या वॉर्डमध्ये मुस्लीम उमेदवार उभा करणारा पक्ष: 12% मुस्लीम मतदारांनी या पर्यायाला पाठिंबा दर्शवला आहे. याचा अर्थ असा की, मुस्लीम समाजातील प्रतिनिधित्व हा मुद्दा काही मतदारांसाठी महत्त्वाचा आहे. बीएमसी निवडणुकीत वॉर्ड-आधारित निवडणुका असल्याने, स्थानिक उमेदवारांच्या निवडीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
2. भाजपला हरवण्याच्या स्थितीत असलेला सर्वात मजबूत उमेदवार: केवळ 2% मतदारांनी या पर्यायाला निवडले. हे दर्शवते की, मुस्लीम मतदारांमध्ये भाजपविरोधी भावना असली तरी, ती स्पष्टपणे एखाद्या उमेदवाराकडे केंद्रित झालेली नाही.










