अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांच्या कुटुंबातील 3 जण निवडणुकीच्या रिंगणात
Mumbai Mahanagar Palika Election : 2017 च्या महापालिका निवडणुकीत नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक आणि बहीण डॉ. सईदा खान हे दोघेही विजयी झाले होते. त्यामुळे यंदाही मलिक कुटुंबाकडे अनुभव आणि स्थानिक पातळीवर मजबूत पकड असल्याचे मानले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांच्या कुटुंबातील 3 जण निवडणुकीच्या रिंगणात
2017 च्या महापालिका निवडणुकीत कप्तान मलिक आणि बहीण डॉ. सईदा खान हे दोघेही विजयी झाले होते
Mumbai Mahanagar Palika Election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी सुरु आहे. राष्ट्रवादीकडून यंदा मलिक कुटुंबातील तब्बल तीन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास हे तिघे उमेदवार असतील, अशी माहिती मलिक कुटुंबाकडून देण्यात आली आहे.
नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण डॉ. सईदा खान आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक हे तिघे यंदाच्या महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी सज्ज आहेत. कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165 मधून निवडणूक लढवणार आहेत. नवाब मलिक यांची बहीण डॉ. सईदा खान या प्रभाग क्रमांक 168 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत, तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी कप्तान मलिक यांचा असलेला प्रभाग क्रमांक 168 हा यंदा महिलांसाठी राखीव झाल्याने रणनीतीत बदल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कप्तान मलिक यांनी स्वतःच्या प्रभागातून सुनेला संधी देण्याचा निर्णय घेतला असून, स्वतःसाठी नवीन प्रभाग क्रमांक 165 निवडला आहे. त्यामुळे मलिक कुटुंबाकडून उमेदवारी ठरवताना प्रभाग रचना आणि आरक्षणाचा बारकाईने विचार करण्यात आल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : मुंबईची खबर: मुंबईकरांनो! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 12 स्पेशल लोकल धावणार...










