मुंबईची खबर: मुंबईकरांनो! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 12 स्पेशल लोकल धावणार...

मुंबई तक

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे तब्बल 12 स्पेशल लोकल गाड्या चालवणार असल्याची बातमी समोर आली आहे. या लोकल ट्रेन रात्री उशिरापर्यंत धावणार असल्याची रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

12 न्यू ईअर स्पेशल लोकल ट्रेन धावणार...
12 न्यू ईअर स्पेशल लोकल ट्रेन धावणार...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

point

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 12 स्पेशल लोकल गाड्या धावणार...

Mumbai News: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे तब्बल 12 स्पेशल लोकल गाड्या चालवणार असल्याची बातमी समोर आली आहे. या लोकल ट्रेन रात्री उशिरापर्यंत धावणार असल्याची रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (31 डिसेंबर) आणि 1 जानेवारी रोजी मुंबईकरांचा रात्रीचा प्रवास सोयीस्कर आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून या निर्णय घेण्यात आला आहे. 

पश्चिम रेल्वेच्या 8 आणि मध्य रेल्वेच्या 4 स्पेशल गाड्या...

प्रवाशांच्या सोयीस्कर प्रवासासाठी न्यू ईअरच्या या स्पेशल उपनगरीय लोकल ट्रेन सेवा सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये पश्चिम रेल्वेच्या 8 आणि मध्य रेल्वेच्या 4 स्पेशल लोकल गाड्यांचा समावेश आहे. न्यू ईअर साजरा करत असणाऱ्या मुंबईकरांना या लोकलच्या या विशेष फेऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे ही वाचा: Govt Job: स्पोर्ट्समध्ये करिअरची स्वप्नं पाहताय? मग, क्रीडा मंत्रालयाच्या 'या' नव्या योजनेसाठी करा अप्लाय...

पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट ते विरार दरम्यान एकूण 8 विशेष उपनगरीय लोकल गाड्या चालवण्यात येणार असून यामध्ये चार अप आणि चार डाउन लोकल गाड्यांचा समावेश असणार आहे. या स्पेशल गाड्या चर्चगेटहून पहाटे 1.15, 2.00, 2.30 आणि 3.25 वाजता सुटतील व अनुक्रमे 2.55, 3.40, 4.10 आणि 5.05 वाजता विरार येथे पोहचतील. तसेच, उर्वरित 4 गाड्या परतीच्या दिशेने विरार येथून पहाटे 0.12, 0.45 , 1.40 आणि 3.05 वाजता सुटतील व चर्चगेटला अनुक्रमे 1.55, 2.25, 3.20, आणि 4.45 वाजता पोहोचतील.  

हे ही वाचा: नेकी का काम, आंदेकरका नाम! गुंड बंडू आंदेकरची घोषणाबाजी, तोंडावर फडकं बांधून भरला उमेदवारी अर्ज

मध्य रेल्वेचं वेळापत्रक 

मध्य रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या विशेष लोकल गाड्या मुख्य मार्ग (मेन लाईन) आणि हार्बर मार्गावर धावणार आहेत. म्हणजेच, मध्य रेल्वे मेन आणि हार्बर मार्गावर प्रत्येकी दोन अशा चार लोकल गाड्या चालवल्या जातील. नववर्षाच्या रात्री सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून पहाटे 1.30 वाजता एक स्पेशल लोकल सुटणार असून ती पहाटे 3.00 वाजता कल्याणला पोहोचेल. त्याचप्रमाणे, कल्याण येथून पहाटे 1.30 वाजता सुटणारी दुसरी स्पेशल लोकल पहाटे 3.00 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. हार्बर मार्गावरील न्यू ईअर स्पेशल लोकल सीएसएमटी येथून पहाटे 1.30 वाजता सुटून 2.50 वाजता पनवेलला पोहोचेल. तसेच, पनवेल येथून पहाटे 1.30 वाजता सुटणारी विशेष लोकल 2.50 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. मध्य रेल्वेच्या चारही विशेष सेवा सर्व स्थानकांवर थांबणार असल्याने सर्व प्रवाशांसाठी सुलभता सुनिश्चित होणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp