अमरावती महापालिका : 2017 मध्ये BJP ने मिळवलेली सत्ता, काँग्रेसचं आणि AMIM ची काय होती स्थिती?

मुंबई तक

Amravati Mahanagar Palika 2026 : अमरावती महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती होता. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ सत्ता स्थापनेपुरती मर्यादित न राहता लोकशाही पुनर्स्थापनेची चाचणी म्हणून पाहिली जात आहे.

ADVERTISEMENT

Amravati Mahanagar Palika 2026
Amravati Mahanagar Palika 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती महापालिका : 2017 साली BJP ने मिळवलेली सत्ता

point

काँग्रेसने 15 तर AMIM ने मिळवलेल्या 10 जागा

Amravati Mahanagar Palika 2026 , अमरावती : महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर विदर्भातील प्रमुख राजकीय केंद्र असलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2017 नंतर तब्बल आठ वर्षांनी अमरावतीकरांना महापालिकेसाठी मतदानाचा हक्क मिळणार असून, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासक राजवट संपुष्टात येणार आहे.

अमरावती महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती होता. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ सत्ता स्थापनेपुरती मर्यादित न राहता लोकशाही पुनर्स्थापनेची चाचणी म्हणून पाहिली जात आहे.

87 जागांसाठी निवडणूक; 6.77 लाख मतदार

अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 22 प्रभागांमधील 87 नगरसेवकांच्या निवडीसाठी होणार आहे. यासाठी एकूण 6 लाख 77 हजार 180 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 3 लाख 37 हजार 935 महिला, 3 लाख 39 हजार 177 पुरुष, तर 68 तृतीयपंथी मतदार नोंदणीकृत आहेत. महापालिका क्षेत्रात 877 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू असल्याने अमरावती महापालिकेत 43 ते 44 महिला नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे.

आरक्षणाची गणिते

हे वाचलं का?

    follow whatsapp