क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेवर जीव जडला अन् विवाहित असून लग्नाची मागणी, पण शेवटी नको ते घडलं अन्...
संबंधित तरुणाचं पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं आणि आश्चर्याची बाब म्हणजे पीडित महिला विवाहित असून आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. पण, यानंतर एक भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेवर जीव जडला अन्...
विवाहित असून महिलेला लग्नाची मागणी
पण, शेवटी नको ते घडलं अन्...
Crime News: दिल्लीतील गुरुग्राममध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने आरोपीने तरुणीवर गोळ्या झाल्याचं वृत्त आहे. संबंधित तरुणाचं पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं आणि आश्चर्याची बाब म्हणजे पीडित महिला विवाहित असून आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही 20 डिसेंबर रोजी सकाळी एमजी रोडवरील एका क्लबमध्ये घडली.
पीडितेच्या पतीने नोंदवली तक्रार...
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेत एक तरुणी गंभीररित्या झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. तसेच, पीडित तरुणीला उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ती पोलिसांना जबाब देण्याच्या परिस्थितीत नव्हती. महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, "माझी पत्नी कल्पना ही गुरुग्राममधील एका क्लबमध्ये कामाला असून दिल्लीच्या संगम विहार येथील रहिवासी असलेल्या तुषार नावाच्या तरुणाने त्याच्यावर गोळी झाडली."
हे ही वाचा: नागपूर: ख्रिसमसच्या रात्री क्लबबाहेर भयानक घडलं, वादाचं हाणामारीत रूपांतर अन् 28 वर्षीय प्रणयची हत्या...
विवाहित महिलेला लग्नासाठी मागणी
पोलिसात तक्रार करताना पीडितेच्या पतीने माहिती दिली की, "माझी बायको 19 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे क्लबमध्ये कामासाठी गेली होती आणि रात्री जवळपास 1 वाजताच्या सुमारास कल्पनाने फोन करून तिला गोळी लागल्याचं सांगितलं." तक्रारदार पुढे म्हणाला की, जवळपास एक महिन्यापूर्वी तुषार आमच्या घरी आला होता आणि त्यावेळी त्याचा आमच्यासोबत खूप वाद झाला होता." पीडितेच्या पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध सेक्टर-29 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा: अकोला हादरलं, पोटच्या मुलीवर बापाचा लैंगिक अत्याचार, काकानेही अब्रू लुटली, नंतर शेजारचा आजोबाही झाला नराधम
पोलिसांच्या तपासादरम्यान, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी तुषार उर्फ जोंटी (25) और उसके दोस्त शुभम उर्फ जोनी (24) यांना उत्तर प्रदेशातील बडौत येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान तुषारने जवळपास सहा महिन्यांपूर्वी कल्पनाशी मैत्री केली होती आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र, आरोपीच्या या मागणीला कल्पनाने नकार दिला असता रागाच्या भरात तुषारने तिच्यावर गोळी झाडली.










