मुंबईतील मतदार कोणती शिवसेना खरी मानतात? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे; पाहा एका क्लिकवर

मुंबई तक

Mumbai Mahapalika election 2026 : असेंडिया या नामांकित सर्वेक्षण संस्थेने मुंबईत केलेल्या सर्वात मोठ्या सर्व्हेचे निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्व्हेतून “खरी शिवसेना कुणाची?” या प्रश्नावर मुंबईकरांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Mahapalika election 2026
Mumbai Mahapalika election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मतदार कोणती शिवसेना खरी मानतात?

point

असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे; पाहा टक्केवारी

Mumbai Mahapalika election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील फूट, ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष आणि मराठी मतदारांची मानसिकता यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर असेंडिया या नामांकित सर्वेक्षण संस्थेने मुंबईत केलेल्या सर्वात मोठ्या सर्व्हेचे निष्कर्ष समोर आले आहेत. या सर्व्हेतून “खरी शिवसेना कुणाची?” या प्रश्नावर मुंबईकरांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली आहेत.

या सर्व्हेनुसार मुंबईतील मोठा वर्ग आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनाच ‘खरी शिवसेना’ मानत असल्याचे चित्र आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या नागरिकांपैकी तब्बल 45 टक्के मतदारांनी ठाकरे गटालाच खरी शिवसेना असल्याचे मत व्यक्त केले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 22 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला, तर मनसेला केवळ 1 टक्का मतदारांनी शिवसेनेचा वारसा मानला आहे.

मराठी मतदारांचा कल कुठे?

या सर्व्हेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी मतदारांची भूमिका. मुंबईतील मराठी मतदार आजही शिवसेनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. मराठी मतदारांमध्ये विचारले असता, 52 टक्के मतदारांनी तिन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावरून शिवसेनेची फूट मराठी मतदारांना मान्य नसल्याचे संकेत मिळतात. त्याचवेळी मराठी मतदारांपैकी 45 टक्के लोकांनी ठाकरे गटालाच खरी शिवसेना मानले, तर 22 टक्के मतदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. मात्र, 24 टक्के मतदारांनी यावर ठाम भूमिका मांडता येत नसल्याचे सांगितले, यावरून अजूनही संभ्रम कायम असल्याचे दिसते.

हेही वाचा : मुंबई महापालिका : मुस्लिम मतदार ठाकरे बंधूंना साथ देणार की काँग्रेसला? सर्वात मोठा सर्व्हे समोर

हे वाचलं का?

    follow whatsapp